सावधान, कोरोना परत येतोय; चीनच्या हाँगकाँगमध्ये आढळले रुग्ण

हाँगकाँग : कोरोना या संसर्गजन्य आजाराने काही वर्षांपूर्वी धुमाकूळ घातला होता. आजाराची सुरुवात चीनमधील वुहानमधून झाली होती. आता पुन्हा एकदा चीनमधूनच कोरोना संकट आले आहे. यावेळी चीनमधील हाँगकाँग मधून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली आहे. सिंगापूर या देशातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. आशियाई देशांमध्ये मागील काही दिवसांपासून कोविड रुग्ण आढळत आहे.

सिंगापूरमध्ये चौदा हजारांपेक्षा जास्त तर चीनमधील हाँगकाँगमध्ये ८० पेक्षा जास्त वृद्ध कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. हाँगकाँगमध्ये कोरोनामुळे ३० वृद्धांचा मृत्यू झाला आहे. यामुळे हाँगकाँगमध्ये कोविड अलर्ट जाहीर झाला आहे. वृद्धांना घरातच राहण्याचे आणि तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थायलंडमध्ये कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे.

भारत सरकारच्या डॅशबोर्डनुसार देशात २५७ कोविड अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आढळलेले कोविड रुग्ण उपचारांनी बरे होतील अशा स्थितीतले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यालाही कोरोना झाला आहे. तो सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार नाही. सध्या ट्रॅव्हिस हेडवर उपचार सुरू आहेत. ट्रॅव्हिस हेडने २०२५ च्या आयपीएलमध्ये ११ सामन्यांमध्ये २८.१० च्या सरासरीने आणि १५६.११ च्या स्ट्राईक रेटने २८१ धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने दोन वेळा अर्धशतके केली आहेत. याआधी २०२४ मध्ये त्याने १५ सामन्यांत ४०.५० च्या सरासरीने आणि १९१.५५ च्या स्ट्राईक रेटने ५६७ धावा केल्या होत्या.

कोरोना संदर्भात बातम्या येऊ लागताच पुन्हा एकदा नागरिकांना लॉकडाऊनची चिंता सतावू लागली आहे. अद्याप सरकारने लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही. नागरिकांनी घाबरू नये पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार करुन घेऊ नये आणि तब्येत बिघडल्यास मास्क घालून डॉक्टरांना भेटावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये टोमॅटो ६०० रुपये किलो, मोफत मिळणारी कोथिंबीरही ५० रुपयांना

इस्लामाबाद : अफगाणिस्तान सोबतच्या संघर्षाचा फटका आता पाकिस्तानला बसू लागला आहे. देशात टोमॅटोच्या किंमती

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! युक्रेन विरूद्ध रशिया युद्धासंबंधी चीनसोबत करणार चर्चा

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो