RR vs PBKS, IPL 2025: पंजाब मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेणार का?

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज पंजाब आणि राजस्थान आमने-सामने भिडणार आहेत. पंजाबला पात्रता फेरीत पोहोचण्यासाठी फक्त एका विजयाची गरज असून ही एक उत्तम संधी आहे. तसेच पंजाबची फलंदाजी राजस्थानपेक्षा वरचढ आहे. मधल्या फळीत जोश इंग्लिश खेळू शकणार नाही त्याची कमतरता पंजाबला नक्कीच जाणवेल.

पंजाबच्या गोलंदाजीचा भार अर्शदीप सिंह व फिरकी मास्टर युजवेंद्र पहलवर असेल. पंजाबसाठी जमेची बाजू म्हणजे महल मेले तीन हंगाम राजस्थानसाठी खेळत होता. त्याचा अनुभव पंजाबसाठी खूप महत्वाचा आहे. आजचा सामना राजस्थानच्या सवाई मानसिंग मैदानावर होणार आहे. राजस्थानची फलंदाजी कमकुवत असल्यामुळे पंजाबचे ध्येय असेल की, २० षटकात २००-२२० धावांचे लक्ष्य राजस्थान समोर ठेवणे, तसेच पंजाबने राजस्थानला हलक्यात घेऊन चालणार नाही, हा संघ मोक्याच्या क्षणी बाजी मारून जातो.

गुजरात विरुद्ध वैभव सूर्यवंशीने याच मैदानावर शतक ठोकून राजस्थानला विजय मिळवून दिला होता. राजस्थान पात्रता फेरीतून बाहेर गेले आहे तरीपण ते पंजाबला सहज विजय मिळवून देणार नाहीत. रॉयल्सचा स्टार गोलंदाज जॉफा आर्चर खेळणार नसून त्याची जागा कोण भरून काढेल यावर सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. चला तर बघूया पंजाब दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा पात्रता फेरीत जाईल का?
Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात