Sunday, May 18, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

आमदार अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाकडून कोट्यवधींचा दंड

आमदार अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला राष्ट्रीय हरित लवादाकडून कोट्यवधींचा दंड
नांदेड : काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाने दणका दिला आहे. देशमुखांच्या मालकीच्या साखर कारखान्यातून राख आणि दूषित पाणी शेतांमध्ये सोडले जाते. यामुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला.

नांदेड जिल्ह्यातील शिवणी जामगा येथे २१ शुगर फॅक्टरी युनिट नंबर ३ कार्यरत आहे. हा साखर कारखाना काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या मालकीचा आहे. या कारखान्यातून निघणारी राख आणि दूषित पाणी शेतात सोडल्यामुळे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. मनोहर धोंडगे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०२३ रोजी हरित लवादाकडे याचिका केली. याचिकेवर ३० एप्रिल २०२५ रोजी निर्णय आला. या निकालाची माहिती प्रा. मनोहर धोंडगे यांनी निकालपत्र हाती आल्यावर प्रसारमध्यमांना दिली.

राष्ट्रीय हरित लवादाने अमित देशमुखांच्या साखर कारखान्याला एक कोटी तेरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ३१ शेतकऱ्यांना ५४ लाख ४३ हजार ९५५ रुपयाचा निधी नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले.
Comments
Add Comment