DC vs GT, IPL 2025: दिल्लीसमोर खडतर आव्हान !

मुंबई(ज्ञानेश सावंत): पहिल्या फेरीत दिल्लीचा जो जोश होता वो आता कमी झाला आहे. त्यांनी सुरुवात एकदम चांगली केली; परंतु हळुहळू त्यांचा खेळ मंदावत गेला. मागील तीन सामन्यांपैकी दोन सानन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला व एक सामना अनिर्णित राहिला त्यामुळे ते सध्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहेत, आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला, तर त्यांना मुंबई इंडियन्सच्या जय-पराजयावर लक्ष्य ठेवावे लागेल; परंतु दिल्ली जर आजचा सामना जिंकली, तर पात्रता फेरीत चुरस निर्माण होईल.


आजचा सामना गुजरातसाठी सराव सामना आहे कारण त्यांचा पात्रता फेरीतील प्रवेश निश्चित आहे. आज दिल्लीसाठी करो या मरो अशी स्थिती असून दुष्काळात तेरावा महिना. या म्हणीप्रमाणे दिल्लीला आणखी एक धक्का बसला आहे तो म्हणजे त्यांचा आघाडीचा गोलंदाज मिशेल स्टार्क हा मायदेशी परतला आहे. त्याच्या जागी मुस्तफिजूर रहमान याला संधी मिळाली आहे.


दिल्लीची फलंदाजी गुजरातसमोर कमकुवत असून आजच्या सामन्यात के. एल. राहुल, अक्षर पटेल, फाफ डुप्लेसिस, करून नायर यांना आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. अरुण जेटली मैदानावर दिल्लीला जिंकायचे असेल, तर अक्षर व कुलदीप यांना आपली फिरकीची जादू दाखवावी लागेल. चला तर बघूयात दिल्ली पात्रता फेरीतील सूत्रे हलवणार का?

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत