Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवाला बीसीसीआयकडून सन्मान, सन्मानानंतर सचिन झाला भावुक

BCCI च्या मुंबईस्थित हेडक्वार्टर्सच्या एका रूमला सचिन तेंडुलकरचे नाव


मुंबई: बीसीसीआयने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) त्याच्या ऐतिहासिक क्रिकेट करकीर्दीबद्दल मोठा सन्मान दिला आहे. तो सन्मान म्हणजे, बीसीसीआयने शनिवारी (दि.१७) त्यांच्या मुंबई मुख्यलायतील एका बोर्ड रूमला सचिन तेंडुलकरचे नाव दिले आहे. त्यानुसार , बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम दिसणार आहे. विशेष म्हणजे, या बोर्डरूमचे उद्घाटन स्वत: सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सचिन तेंडुलकरचा सिंहाचा वाटा आहे. मास्टर ब्लास्टरच्या या योगदानाची दखल घेऊन बीसीसीआयने सचिनला सन्मानित केले आहे.

बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ





बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर या रूमचे उद्घाटन करताना बीसीसीआयचे चेअरमन रोजर बिन्नी सचिव देवजीत सैकीया आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला सहित अन्य अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. या बोर्डरूमच्या उद्घाटनानंतर सचिन तेंडुलकर भावुक झालेला दिसला. "मला दिलेल्या या सन्मानाबद्दल बीसीसीआयच्या सर्व अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो, हे अविश्वसनीय आहे. कारण मी प्रत्यक्ष जीवनात असे पहिल्यांदाच पाहत आहे. माझी सुरुवात येथूनच झाली. बीसीसीआयच्या बोर्ड रूमला माझे नाव देणे, हा खरोखरच माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी क्षण आहे. एक पूर्ण रूम माझ्या नावावर असणे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. ", असे सचिन तेंडुलकरने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

यादरम्यान, सचिन तेंडुलकरने 1989 सालाची आठवण काढली, त्याने सांगितले "जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया समोर एक छोटीशी रूम असायची. मला आजही आठवते, ते त्या दिवसात बीसीसीआयचं ऑफिस असायचं. त्याच वर्षी मी पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हापासून आज या ठिकाणी पोहोचणे खरंच अभिमानाची गोष्ट आहे."  दरम्यान, बीसीसीआयने सचिन तेंडुलकर आधी मुंबई मुख्यलयातील एका रूमला भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांचे नाव दिले आहे.

सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत ४८.५२ च्या सरासरीने एकूण ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. यात विश्वविक्रमी १०० शतकांचा समावेश आहे. सचिन कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे १५ हजार ९२१ धावा आणि १८ हजार ४२६ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (५१ शतके) करण्याचा विक्रमही आहे.
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या