"आर्थिक निकषांवर ओबीसींना आरक्षण नको, ते जातनिहायच हवे": भुजबळ

नाशिक: ओबीसी म्हणजे कोणतीही एकच जात नसून महाराष्ट्रातील तमाम वंचित आणि शोषित जे सर्व मूलभूत हक्कांपासून स्वातंत्र्योत्तर कालखंडापासून सुरू आहे, त्या ३७४ जातींचा हा बहुजन वर्ग आहे. त्यामुळे आर्थिक निकषांवर आरक्षण न देता ते केवळ जातीयनिहाय जनगणनेतून मिळावे तरच या वर्गाला मूळ प्रवाहात आणता येईल असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


गंगा घाटावरील देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे स्व.वसंतराव नेवासकर स्मृतिव्याख्यानात "ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना " या विषयावर भुजबळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष विलास शिंदे, अरुण नेवासकर,आदी उपस्थित होते. भुजबळ पुढे म्हणाले की, ओबीसींच्या हक्काची लढाई ही स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची आहे.


जातीनिहाय जनगणनेची मागणी महात्मा फुले यांनी १८६९ साली ब्रिटिश सरकारकडे केली. त्यानंतर १८७१ साली पहिली जनगणना ब्रिटिश सरकारने केली. १९३१ च्या जनगणनुसार ५४ टक्के समाज हा इतर मागासवर्गीय असल्याचे समोर आले मात्र त्यानंतर ओबीसींना अजूनही त्यांच्या हक्काचे काहीच मिळाले नाही अशी खंत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.



आरक्षण नसल्याने ओबीसी समाज वंचित - भुजबळ


आर्थिक निकष हे तात्कालीक असतात, एखाद्या व्यवसायाची जर आर्थिक निकषांवर मोजमाप करायचे ठरवले तर एखाद्या वर्षी व्यवसाय खूप चालतो. मात्र कालांतराने हाच व्यवसाय तोट्यात जातो. त्यामुळे बहुसंख्य लोकांचा समाज असलेला ओबीसी हा वर्ग त्यात असणाऱ्या आदिवासी महिला, साळी, माळी, कोळी, अशी असेल की, ही मंडळी आज आपल्या हक्कासाठी लढत आहे. मात्र केवळ आरक्षण नसल्याने ते समाजाच्या मूळ प्रवाहात येत नाहीत. ओबीसी आरक्षण हे केवळ राजकारण झाल्याने आजवर थांबले आहे. महात्मा गांधींनी सुद्धा स्वातंत्र्यानंतर सुराज्य जर मिळवायचा असेल तर केवळ पाच टक्के लोकांचा विकास होऊन भागणार नाही तर असंख्य समुदाय असणारा जो बहुजन वर्ग आहे त्या बहुजन वर्गाला सोबत घेऊन सरकारने विकास करावा अशी मागणी केली होती.


भुजबळ यांनी यावेळी सांगितले की, मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठा लढा दिला. ओबीसींना शिक्षणात नोकरीमध्ये राजकारणात सर्वत्र आरक्षण मिळावे ही मागणी मंडल आयोगाची होती. आपण मंत्री असताना अखिल भारतीय महात्मा फुले सत्ता परिषदेमार्फत ओबीसीच्या न्याय हक्कासाठी दिल्लीच्या जंतर मंतर, रामलीला मैदानावर उपोषण केलं. केवळ महात्मा ज्योतिबा फुले यांचा एक फोटो लावून सुमारे तीन लाख लोक आंदोलनासाठी उपस्थित होते. अशा अनेक आठवणी यावेळी भुजबळ यांनी सांगितल्या.



स्व. वसंतराव नेवासकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत


कार्यक्रमाच्या सुरुवातीला  स्व. वसंतराव नेवासकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली, तसेच त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांचे उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत देवर तसेच प्रमुख पाहुण्यांचे परिचय व स्वागत संगीता बाफना यांनी केले. व्याख्यानानंतर संतोष फासाटे प्रस्तुत सदाबहार हिंदी गाणी सादर झाली यात अविनाश देवरुखकर, राजीव पवार, गोरख गायकवाड, नमिता राजहंस विशाखा जगताप सीमा जाधव अनिल पगारे आदींनी आपला सहभाग नोंदवला.

Comments
Add Comment

एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटेंच्या भावाला बेदम मारहाण

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधू आणि शिवसेना जिल्हाप्रमुख

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

HDFC Bank Update: दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या कर्ज पुरवठ्यात लक्षणीय वाढ

प्रतिनिधी: एचडीएफसी बँकेने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक माहिती एक्सचेंजला दिली आहे. त्यातील

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द