Movie Teaser: ‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

  59

Jaran Movie Teaser ‘जारण’च्या थरारक पोस्टर्सनंतर आता त्याचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. एका विवाहितेच्या आयुष्यात आलेले विचित्र अनुभव, तिच्या घरात घडणाऱ्या असामान्य घटना आणि त्यामागचे धक्कादायक गूढ या सगळ्याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. या सिनेमाचे टॅगलाईन ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’ या वाक्यातून कळते, की तिच्या भोवती घडणाऱ्या असामान्य गोष्टी केवळ वर्तमानाच्या नसून त्या भूतकाळाशी जोडलेल्या आहेत. या चित्रपटच्या टीझरमधील अनिता दातेचा अवतार भयावह आहे.  लाल साडी, मोकळे केस, कपाळावर कुंकू आणि डोळ्यात अनोखी ऊर्जा असलेल्या अवतारामध्ये ती दिसून येते.


अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ हा चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॅालिवूडला ‘भुलभुलैया २’, ‘भुलभुलैया ३’, ‘वेलकम’ यांसारखे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी ‘जारण’च्या निमित्ताने प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.


दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ ही एका कुटुंबाच्या आयुष्यात घडलेल्या मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे. करणी, जारण यांसारख्या अंधश्रद्धा आणि त्यांचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल, असा हा चित्रपट असून प्रेक्षकांना ‘जारण’ नक्कीच आवडेल, अशी मी आशा करतो.”


निर्माते अमोल भगत म्हणतात, “ चित्रपटाच्या पोस्टर्सना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून खूप आनंद होतो. आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. पोस्टर्सप्रमाणे टीझरही प्रेक्षकांचे लक्ष वेधले असेल, याची मला खात्री आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या असून चित्रपटात कुटुंबातील बारीकसारीक भावभावना, मानसिक तणाव, आणि अंधश्रद्धांमुळे नात्यात येणारा दुरावा हे सगळे पाहाणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.”


Comments
Add Comment

Marathi Movie: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचं पोस्टर रिलीज

Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा

New Marathi Movie: हिरो सहा, पण हिरोईन एकच! मृण्मयी देशपांडेचा नवा चित्रपट लवकरच

‘मना’चे श्लोक’ चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सध्या मराठी चित्रपटसृष्टीत जबरदस्त आणि दर्जेदार

'द ट्रेटर्स' १२ जूनपासून प्राइम व्हिडिओवर

मुंबई : प्राइम व्हिडिओने अनस्क्रिप्टेड रिअॅलिटी शो 'द ट्रेटर्स' चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. आता १२ जूनपासून

नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण’च्या सेटवरून यशचा पहिला लूक

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित प्रोजेक्टपैकी एक असलेल्या रामायणमध्ये आता

Marathi Movie Trailer: ‘आंबट शौकीन’ मधून मराठी कलाकारांची दमदार फौज प्रेक्षकांच्या भेटीला

धमाल चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी सांगणाऱ्या ‘आंबट शौकीन’चा धमाल ट्रेलर

दीपिकाच्या नव्या लूकने साऱ्यांना घातली भुरळ

स्टॉकहोम : स्टॉकहोममध्ये नुकत्याच झालेल्या कार्टियर इव्हेंटमधील दीपिका पदुकोणचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.