Mud Pot Water : युग रेफ्रिजरेटरचं, अन् क्रेझ माठाची!

तहान भागवणारा, आरोग्य जपणारा माठ आहे गुणकारी


आधीच उन्हाळा, त्यात अवकाळी. त्यामुळे उष्णतेत कमालीची वाढ झालीय. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. घसा कोरडा पडतोय. अशा कोरड्या घशाला थंड पाणी प्यायला मिळाले तर...तर मग सोन्याहून पिवळंच की. आजकाल सर्वांकडे रेफ्रिजरेटर असतात, तरीही माठातलं पाणी पिण्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. मातीच्या भांड्यातील पाण्याचा नेमका काय होतो फायदा आणि माठातील पाणी पिण्याची क्रेझ का वाढतेय, जाणून घेऊया या लेखातून...

ऐन उन्हाळ्यात थंड पाणी पिणं कुणाला आवडणार नाही? फ्रिजमधील थंड पाणी पिऊन तहान शांत केली जाते. त्यातच सर्वांकडे फ्रिज असल्यामुळे थंड पाणी सहज उपलब्ध असतं. असं असलं तरी मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याची क्रेझ वाढतेय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात माठाला मोठी मागणी आहे आणि माठातील पाणी प्यायल्याने समाधानही मिळतं. भारतात माठातील पाणी पिण्याची परंपरा पूर्वापार आहे. माठातील पाणी सहज पचतं. आयुर्वेदातही मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. जर्नल ऑफ इजिप्शियन पब्लिक हेल्थ असोसिएशनने त्याचं महत्त्व स्पष्ट केलंय. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्यापेक्षा मातीच्या भांड्यांमधील साठवलेलं पाणी हे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असतं असं नमूद करण्यात आलंय.


चला तर मग आता पाहूयात मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे



  • उष्माघातापासून संरक्षण करणं

  • हायड्रेशन वाढवणं

  • शरीर डीटॉक्स करणं

  • पचन सुधारणं

  • प्लास्टिकच्या विषापासून दूर ठेवणं

  • शरीराचं तापमान संतुलित ठेवणं

  • असिडिटी आणि गॅस न होणं


आता पाहूयात मातीच्या भांड्यामध्ये पाणी कसं थंड होतं ते. मातीची भांडी अथवा माठ यांना छिद्रं असतात. या छिद्रांतून पाणी भांड्याच्या बाहेर झिरपतं. त्यानंतर त्याच्या बाष्पी भवनाला सुरुवात होते. त्यानंतर पाणी हळूहळू थंड होण्यास सुरुवात होते. त्याचरोबर मातीच्या भांड्यांमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे खनिजे पाण्यात विरघळतात. पाण्याचं भांड किंवा माठ नवीन असेल तर जवळपास १२ तास भिजत ठेवणं महत्त्वाचं असतं. हे सर्व करताना मातीची भांडी स्वच्छ कशी ठेवावीत हेही पाहूयात...


कशी ठेवाल मातीची भाडी सुरक्षित ?


भांडं सावलीच्या ठिकाणी ठेवा, बॅक्टेरिया वाढू नयेत यासाठी नियमित स्वच्छ करा, दररोज शिळे पाणी बदला आणि ताजे भरा, भांडं स्वच्छ करताना साबणाचा वापर टाळा, मातीचं भांडं फ्रिजमधील थंड पाण्याने भरू नका. तुम्हाला तहान भागवायची असेल आणि आरोग्यही जपायचं असेल तर मातीच्या भांड्यातील किंवा माठातील पाणी पिणं गरजेचं आहे. कारण मातीच्या भांड्यातून आपल्याला नैसर्गिक थंडावा मिळत असतो. त्यामुळे आधुनिक युग फ्रिजचं असलं तरी माठाची क्रेज कमी झालेली नाही.
Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री