RCB vs KKR: चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पावसाचा कहर, सामना रद्द झाल्यास केकेआर-आरसीबीला किती होणार नुकसान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. मात्र या सामन्याच्या आधी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अशातच हे जाणून घेणे गरजेचे आहे की सामना रद्द झाल्यास कोणाला किती नुकसान होणार आहे...

पाऊस बिघडवणार केकेआरचा खेळ


या सामन्याच्या आधीपासूनच पावसाची शक्यता होती. बंगळुरूमध्ये पावसाची ७० टक्के शक्यता वर्तवण्यात आली होती. चिन्नास्वामी स्टेडियमचे ड्रेनेज सिस्टीम चांगली आहे आणि पाऊस थांबल्यानंतर येथे काही वेळात खेळ सुरू होऊ शकतो. मात्र हवामानाबाबत काहीच सांगता येत नाही.

 



पावसामुळे आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना धुतला गेला तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. अशातच आरसीबीचे १७ गुण होतील आणि ते प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करतील. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२५च्या प्लेऑफमधून बाहेर जातील. सामना धुतल्यास केकेआरचे १२ गुण होतील आणि शेवटा सामना जिंकल्यास त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत