BCCI च्या निर्णयामुळे कोलकाताचे क्रिकेटप्रेमी भडकले

कोलकाता : भारत - पाकिस्तान संघर्षामुळे काही दिवसांसाठी स्थगित केलेली आयपीएल २०२५ ही क्रिकेट स्पर्धा आज म्हणजेच शनिवार १७ मे पासून पुन्हा सुरू होत आहे. आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रंगणार आहे. हा सामना सुरू होण्याआधीच आयपीएलमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. आधीच्या नियोजनानुसार कोलकाता येथे अंतिम सामना होणार होता. पण आता नव्या वेळापत्रकानुसार अंतिम सामना कोलकाता ऐवजी देशातील दुसऱ्या एखाद्या मोठ्या स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी स्टेडियम क्वालिफायर २ आणि अंतिम सामन्यासाठी निवडले आहे. हे दोन्ही सामने अनुक्रमे एक आणि तीन जून रोजी होणार आहेत. यामुळे वादाला तोंड फुटले आहे. कोलकाताचे क्रिकेटप्रेमी अंतिम सामना ईडन गार्डन स्टेडियम येथेच व्हावा यासाठी आग्रही आहेत आणि आंदोलन करत आहेत. बीसीसीआयने अद्याप दोन्ही क्वालिफायर मॅच (पात्रता फेरीचे सामने), एलिमिनेटर (बाद फेरीचा सामना) आणि अंतिम सामना कुठे खेळवणार हे जाहीर केलेले नाही. पण आधीच सामन्यांच्या ठिकाणांवरुन वादाला तोंड फुटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली आणि पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला. आता हा सामना नव्याने २४ मे रोजी खेळवला जाणार आहे. आधी धरमशाला येथे ८ मे रोजी झालेला सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला होता. आता २४ मे रोजी हा सामना जयपूर येथे होणार आहे.
Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात