२५० बांगलादेशींना पोलिसांनी दाखवला घरचा रस्ता

मुंबई : भारतात घुसखोरी करून मुंबईत तळ ठोकणाऱ्या बांगलादेशींवर सध्या धडक कारवाई सुरू आहे. पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसांत तब्बल २५० बांगलादेशी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आल्याचे समजते आहे.


एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच प्रत्यार्पणाची कारवाई करण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिक मुंबईत विविध ठिकाणी बेकायदा वास्तव्य करत आहेत. त्यातील अनेक जण येथे काम करून लखपती झाल्याचेही तपासातून समोर आले आहे. पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असली तरी बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठवण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. अनेक बांगलादेशी भारतात स्थिर झाल्यानंतर इतर बांगलादेशी नागरिकांनाही येथे स्थायिक करण्यासाठी बेकायदा काम करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्याविरोधात एटीएस, मुंबई पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.


संशयित बांगलादेशी नागरिकांचे बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवली जात आहे. याशिवाय रेशनकार्ड, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जात आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री १४५ बांगलादेशींना पाठवण्यात आले असून, त्यात ७० हून अधिक महिलांचा समावेश आहे. त्याखालोखाल पुरुष, लहान मुले आणि तृतीयपंथींचा समावेश आहे. शुक्रवारीही १५० हून अधिक जणांना परत पाठविण्याची प्रक्रिया करण्यात आली.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे