Nasik News: छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

नाशिक: आयकर विभागाचा अधिकारी असल्याचे सांगून माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा खंडणीखोर 27 वर्षाचा उच्चशिक्षित तरुण असून, त्याचे आव दिलीप भुसारे असे आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ च्या पथकाने करंजाळी येथील हॉटेलमध्ये सापळा रचून त्याला रंगेहाथ अटक केली.


छगन भुजबळचे स्वीय सहाय्यक गायकवाड यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकांवरून वारंवार फोन येत होते. आरोपी स्वतःला आयकर अधिकारी सांगून त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार असल्याची धमकी देत त्याच्या मोबदल्यात १ कोटी रुपये मागत होता. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी त्याने गायकवाड यांना दिली होती. मात्र स्वीय सहाय्यक यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. त्यानंतर पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत गायकवाड यांना गुजरातच्या धरमपूर येथे बोलावून आरोपीस पैसे देण्यासाठी आणण्यास सांगितले.त्यांनंतर आरोपी राहुल दिलीप भुसारेला रंगेहाथ अटक केली गेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Comments
Add Comment

मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का पाहिजे?

या प्रश्नाचे खरे उत्तर देण्याची छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या सुशिक्षित नेत्यांकडे मागणी नाशिक : मराठा

नाशिक इंडस्ट्रियलची डेस्टिनेशनकडे वाटचाल

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट टेस्टिंग लॅब ही ऊर्जा मीटर्स ट्रान्सफार्मसी ऑइल इन्सुलेशन प्रयोग शाळा, केबल,

पाहुणे आले आणि दागिने चोरून पसार झाले

नाशिक : घरात मुक्कामासाठी आलेल्या पाहुण्यांनी रात्रीच्या सुमारास घरातील १८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून

अंत्ययात्रेची तयारी झाली पण खोकल्याने वाचला तरुणाचा जीव!

नाशिक : अपघातामध्ये जखमी झालेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तरुण मृत झाल्याचा माहितीवरून परिवाराने

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात

कांदा खरेदी करूनही नाफेड' , एनसीसीएफने थकविले बळीराजाचे पैसे

नाशिक : राज्यामध्ये केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी करून देखील