धार्मिक पशुवधाच्या परवानगीच्या अर्जासाठी यंदा ऑनलाईन सुविधा उपलब्ध

बकरी ईद सणानिमित्त महानगरपालिकेकडून पूर्वतयारीसंदर्भात समन्वय बैठक


मुंबई : बकरी ईद २०२५ सणाच्या निमित्ताने धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा माय बीएमसी अ‍ॅप्लिकेशनवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे.


तसेच, देवनार पशुवधगृह येथे पशु बाजार तसेच धार्मिक पशुवधासाठी विविध प्रकारची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण व्यवस्थेत सहभागी सर्व यंत्रणांनी आपापसांत समन्वयाने जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या पूर्वतयारींचा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी १६ मे २०२५ रोजी आयोजित समन्वय बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले.
महानगरपालिका उपायुक्त चंदा जाधव, पोलिस उपायुक्त प्रदीप चव्हाण, सहायक आयुक्त पृथ्वीराज चौहाण, सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले, सहायक पोलिस आयुक्त राजेश बाबशेट्टी, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध खात्याचे अधिकारी, पोलीस दल, महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, कोरा केंद्र, वैध मापनशास्त्र विभाग, अदानी इलेक्ट्रिसीटी आदी यंत्रणांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, देवनार पशुवधगृहात विविध यंत्रणांकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारींचा आढावा घेतल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, ईद सणाच्या कालावधीत नागरिकांची होणारी मोठी गर्दी, पशुंची संख्या तसेच उपाहारगृहासारख्या सुविधा देताना सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. येथे येणाऱ्या नागरिकांना नाममात्र शुल्कात वाहनतळ उपलब्ध करुन द्यावे. वाहनतळासह देवनार पशुवधगृहाच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीद्वारे निगराणी ठेवावी. सुरक्षेच्या बाबतीत अत्यंत दक्ष राहत चोख कायदा व सुव्यवस्था राखावी. नागरिकांना सुस्पष्टपणे दिसतील, अशाप्रकारचे सूचना फलक जागोजागी लावावेत.


परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तात्काळ कारवाई करावी आणि कारवाईसाठी विशेष पथक नेमावे, इत्यादी निर्देशही डॉ. जोशी यांनी यावेळी दिले. ७ जून २०२५ व त्यानंतरच्या दोन दिवसांच्या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. देवनार येथे पशुंसाठी सुमारे ७७ हजार ८५० चौरस मीटर क्षेत्रावर निवारा उभारण्याचे काम सुरू आहे. २५० केव्हीए क्षमतेचे ८ आणि १२५ केव्हीए क्षमतेचे १९ विद्युत जनित्र येथे उपलब्ध करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन