मुंबईकरांच्या शनिवारची सुरुवात पावसाने

मुंबई : मुंबईकरांच्या शनिवारची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. छत्री हाती नसल्यामुळे भिजत जवळच्या आडोश्यापर्यंत पोहोचताना नागरिकांची धावपळ झाली.

हवामान विभागाने मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region or MMR) शनिवारी हलक्या सरींची शक्यता वर्तवली होती. तसेच काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता. पुढील पाच दिवस राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता.

मुंबईत शुक्रवारी ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. पण शनिवारी सकाळीच पावसाचे आगमन झाले आणि पारा घसरला.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहील. संध्याकाळी किंवा रात्री निवडक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्यची शक्यता आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे थोडा दिलासा मिळेल.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती