Doha Diamond League: नीरज चोप्राची स्वप्नपूर्ती! पहिल्यांदाच गाठला ९० मीटरचा टप्पा, दुसऱ्या क्रमांकावर मिळवले स्थान

दोहा: दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने (Niraj Chopra), दोहा डायमंड लीग (Doha Diamond League) मध्ये त्याच्या २०२५ च्या हंगामाची शानदार सुरुवात केली. दोहा येथील सुहेम बिन हमाद स्टेडियमवर झालेल्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरजने तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटर भालाफेक करत, ९० मीटरचा अडथळा पार केला आहे.  परंतु डायमंड लीगच्या दोहा लेगमध्ये तो जर्मनीच्या ज्युलियन वेबरच्या मागे दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. असे असले तरी, ९० मीटर अंतर पार करणारा नीरज चोप्रा जगातील २५ वा आणि आशियातील तिसरा खेळाडू ठरला आहे. 


वेबरने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात ९१.०६ मीटर फेकले. वेबरने पहिल्यांदाच ९० मीटरपेक्षा जास्त फेक केली आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील २६ वा खेळाडू ठरला. दोन वेळा विश्वविजेता आणि पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, ८४. ६५ मीटर फेकसह तिसरे स्थान पटकावले. भारताचा किशोर जेना ७८. त्याने ६० मीटर फेकून आठवे स्थान पटकावले.


ऑलिंपिक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम (९२.९७) आणि चायनीज तैपेईचा चाओ सुन चेंग (९१.३६) हे ९० मीटरपेक्षा जास्त फेकणारे एकमेव आशियाई खेळाडू आहेत. सामन्यानंतर प्रसार मध्यमांशी संवाद साधताना नीरज चोप्रा म्हणाला, "९० मीटरचा अडथळा पार केल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे, पण तो एक तिखट आणि गोड अनुभव होता. माझे प्रशिक्षक जान झेलेन्स्की म्हणाले की मी आज ९० मीटर अंतर पार करू शकतो. वाऱ्याने मदत केली आणि हवामान थोडे गरम असल्यानेही मदत झाली."


तो पुढे असे देखील म्हणाला की, “मला विश्वास आहे की मी येणाऱ्या स्पर्धांमध्ये यापेक्षा जास्त चांगली कामगिरी  करू शकतो. मी काही पैलूंवर काम करणार आहे आणि या हंगामात पुन्हा ९० मीटर अंतर पार करेल.”



डायमंड लीग फायनलमधील विजेत्याला डायमंड ट्रॉफी


डायमंड लीगच्या एका टप्प्यात प्रथम स्थान मिळवण्यासाठी एका खेळाडूला ८ गुण मिळतात. तर दुसऱ्या क्रमांकासाठी ७ गुण, तिसऱ्या क्रमांकासाठी ६ गुण आणि चौथ्या क्रमांकासाठी ५ गुण दिले जातात. म्हणजे नीरज चोप्राला ७ गुण मिळाले, तर वेबरला ८ गुण मिळाले. डायमंड लीग २०२५ चा समारोप २७ आणि २८ सप्टेंबर रोजी झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीग फायनलने होणार आहे. डायमंड लीग फायनलमधील विजेत्याला डायमंड ट्रॉफी मिळते.


चोप्राने २०१८ मध्ये दोहा डायमंड लीगमध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता तेव्हा त्याने ८७. ४३ मीटर अंतर फेकून चौथ्या क्रमांकावर राहिला होता. त्यानंतर २०२३ मध्ये ८८.६७ मीटर अंतर भाला फेकून त्याने पहिले स्थान पटकावले होते.  २०२४ मध्ये त्याने ८८ .३६ मीटर अंतर भाला फेक करत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले, तर ज्युलियन वेबरने ९१.०६ मीटर भालाफेक केली. त्याने त्याच्या शेवटच्या थ्रोमध्ये नीरज चोप्राला मागे टाकले. ज्युलियन वेबरची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली आहे. 



९० मीटर अंतर पार करण्यापूर्वी नीरज चोप्राचे पाच टॉप थ्रो


८९.९४ मीटर स्टॉकहोम डायमंड लीग २०२२


८९.४९ मीटर लॉसाने डायमंड लीग २०२४


८९.४५ मीटर पॅरिस २०२४ ऑलिंपिक - एफ


८९.३४ मीटर पॅरिस २०२४ ऑलिंपिक - क्यु 


८९.३० मी पावो नूरमी गेम्स २०२२.


एकंदरीत काय तर, नीरज चोप्राने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ९० मीटरचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या थ्रोने त्याने राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे. 

Comments
Add Comment

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण