पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांची लगबग सुरू!

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी पट्ट्यात व मुरबाड शहर परिसरात ६ मे २०२५ पासून ते १६ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसत आहे. शेतकरी वर्गाने पावसाळ्या आधीच शेतीच्या कामांना सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण जून महिन्यात पडणारा पाऊस आता मे महिन्यात पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आपापल्या जमिनीची मशागत ट्रॅक्टर व जेसेबी द्वारे करताना दिसत आहे; परंतु हा मे महिन्यात पडणारा अवकाळी पाऊस शेतकरी वर्गांना जूनमध्ये भात पेरणी हंगामात दगा देतो की काय अशी चर्चा वयोवृद्ध शेतकरी करताना दिसत आहेत. त्यामुळे जून महिन्याऐवजी ऐन मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यासारखा वाटत आहे.


कारण मे महिन्यासारख्या कडक उन्हाळ्यात पाऊस कदाचित एकदा किंवा दोनदा पडतो; परंतु यंदा मे महिन्यात दहा ते अकरा दिवस पाऊस पडताना दिसत आहे. अशा अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे रानमाळावर गवत उगवू लागले आहे. त्यामुळे जून महिन्यात पाऊस कसा पडणार या भीतीपोटी शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. संध्याकाळी पडणाऱ्या पावसामुळे काही प्रमाणात हवेतील गारवा जाणवतो परंतु सकाळी व दुपारी मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवते.

Comments
Add Comment

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके