Freight Trains : मालगाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार!

महानगरात या रेल्वेमार्गाचे काम वेगात


मुंबई : भारतातील मालवाहतुकीच्या पायाभूत सुविधांना वेग आणि चालना देण्यासाठी, मालगाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगरात या रेल्वेमार्गाचे काम वेगात सुरू आहे. नुकताच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (डीएफसीसीआयएल) वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (डब्ल्यूडीएफसी) जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण – निळजे विभागातील कळंबोली येथे ११०.५ मीटर लांबीचा आणि सुमारे १,५०० टन वजनाचा एक मोठा स्टील गर्डर यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे. कळंबोली येथे सर्वाधिक लांबींच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डरच्या उभारणीमुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.



भारतीय रेल्वे आधुनिकतेच्या दिशेने पाऊल टाकत असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणपूरक वाहतुकीकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी देशभरात मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यामध्ये पश्चिमेकडील ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट काॅरिडोर’ची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या जेएनपीटी-वैतरणा समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देशातील मालवाहतुकीसाठी २,८४३ किमी लांबीचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) हा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.


या प्रकल्पातील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) – वैतरणा विभाग महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) ट्रक, कंटेनरची रस्ते वाहतूक बंद करून रेल्वेमार्गे माल वाहतूक केली जाणार आहे. यामुळे उरण, पनवेल, कळंबोलीसह सर्व परिसरातील कंटेनर, ट्रकच्या वाहतुकीची वर्दळ कमी होणार असून प्रदूषणाला आळा बसणार आहे. डीएफसीसीआयएलने बांधलेला कळंबोली येथील रेल्वे उड्डाणपूल आतापर्यंतचा सर्वाधिक लांब पूल आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.



९ भुयारी मार्ग


वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा जेएनपीटी – वैतरणा विभाग १०३ किमीपर्यंत विस्तारला असून तो खारबाव आणि तळोजाला जेएनपीटीशी जोडतो. या विभागात ५३ मोठे पूल, २४२ लहान पूल, ३ यार्ड/स्थानक इमारती, १.१७ किमी लांबीचे बोगदे, १० उड्डाणपूल, ९ भुयारी मार्ग असणार आहेत.




मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग


भारतीय रेल्वेमध्ये २,८४३ किमी लांबीचा मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. पंजाबमधील लुधियाना आणि पश्चिम बंगालमधील डानकुनी असा पूर्व मालवाहतुकीचा मार्ग आणि उत्तर प्रदेशमधील दादरी ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी वेगळा मार्ग उपलब्ध केला आहे.

Comments
Add Comment

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही