पाहिला डोळेभरी

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


परमेश्वराचा विस्तार सतत होत राहिलेला आहे. आपण आपले जग आणि परमेश्वर या सर्वच एकमेकांशी अत्यंत जवळचा आणि घनिष्ट संबंध आहे, पण अशा महत्त्वाचा विषयाचा अभ्यास किंवा इतर समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्याऐवजी काही लोक विचित्र समज सर्वसामान्य लोकांत पसरवून दिशाभूल करतात. काही जण म्हणतात जगबुडी होणार. आम्ही स्पष्ट सांगतो आहोत की कुणीही कितीही सांगितले की जगबुडी होणार तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. अशी जगबुडी कधीही होणार नाही आणि जगबुडी झालीच, तर कोण उरणार आहे जग बुडाले हे सांगायला. काही मूर्ख लोक असे सांगतात की, आमचे ते डोंगरावर स्थान आहे तिथे आम्ही सगळे जाऊन राहणार. अरे मूर्खांनो जग बुडाले, तर तो डोंगर बुडणार नाही का? इतकीसुद्धा अक्कल त्या लोकांना नाही.


तो डोंगर कधीही पाण्याखाली जाऊ शकतो.आता मुंबईचे सुद्धा कधी वाळवंट होईल सांगता येत नाही. ती कधीही पाण्याखाली जाऊ शकते. याचे कारण पर्यावरण बिघडत चाललेले आहे.


काही गावे तर पाण्याखाली गेली सुद्धा आहेत. हे सर्व जर आपण पाहिले, तर परमेश्वराच्या शक्तीचा केवळ अंदाज बांधता येतो. मात्र असे असूनही परमेश्वराचे वर्णन जसा आहे तसे, जेवढे आहे तेवढे कोण करू शकेल. कुणीच करू शकत नाही. तो आहे तसा कुणीच सांगू शकत नाही. सत्य म्हणजे त्याचे असणे हे अनंत आहे. त्याचे ज्ञान तेही infinite आहे. आनंद हा ही infinite आहे. गगनाचे प्रावरण म्हणजे त्याला रूप नाही, रंग नाही असा हा डोळेभरी कसा पाहिला.


सत्यज्ञानानंद
गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे
तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहता पाहणे दुरी सारुनिया


तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी. तो हा श्रीहरी म्हणजे इथेच पाहिला. बाहेरही पाहिला आणि आतही पाहिला. आत पाहिल्यामुळे तो बाहेर आहे हे दिसू लागले. बाहेरही तोच आहे हे मला दिसायला लागले. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.


“अवघी भुते साम्ये आली देखिली म्या कई होती
विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा
माझी कुणी न धरो शंका ऐसे हो का निर्द्वंद्व
तुका म्हणे जे जे दिसे ते ते वाटे मी ऐसे’’


सर्व ठिकाणी मीच दिसायला लागलो. आतमध्येही तोच व बाहेरही तोच. बाहेर जो आहे तोच या ठिकाणी मी रूपाने आहे. असे हे सगळे गणित आहे. अध्यात्माचे हे जे गणित आहे ते एका अर्थी समजायला सोपे आहे व एका अर्थी ते समजायला कठीण आहे. समजायला सोपे आहे ते सद्गुरुंचे मार्गदर्शन असेल आणि समजायला कठीण असेल, तर ते सद्गुरुंचे मार्गदर्शन नसेल.

Comments
Add Comment

Shravan Putrada Ekadashi 2026 : श्रावण पुत्रदा एकादशी 23 ऑगस्टला; जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि धार्मिक महत्त्व

Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे

Babulnath Temple : मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी!

मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे

कर्म हेच ब्रह्मदेव

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे या विषयाअंतर्गत आपण संचित प्रारब्ध ह्या संकल्पना समजावून

दशदिक्षु स्थितं दैवं, दशशक्तिसमन्वितम्

प्रभाती सूर नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती पानोपानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदीत जागी होऊन फुले

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा जाऊ पाहे ।।

कान्हो, ते तुझ्यासाठी केलेले दागिने काय पेटीत ठेवण्यासाठी केले आहेत? जरा अंगावर घाल, बिदरचे सरदार येणार आहेत आज

आत्मपरीक्षण

आत्मज्ञान - प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनातील सर्वांत गुंतागुंतीचा शोध कोणता, असा प्रश्न विचारला तर त्याचे