स्वप्न साकार होणार, महामुंबईत हक्काचं घर होणार

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जागेचे दर गगनाला भिडू लागले आहेत. चांगल्या परिसरात घर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे अनेकांसाठी आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे. अशा नागरिकांचे मुंबईजवळ हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाचा कोकण विभाग सरसावला आहे. लवकरच म्हाडा कोकण विभाग घरांची सोडत काढणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचा कोकण विभाग म्हणजेच म्हाडा कोकण जुलै २०२५ मध्ये चार हजार घरांची सोडत काढण्याची तयारी करत आहे. या सोडतीतील अर्थात लॉटरीतील किमान एक हजार घरं ही ठाण्यातील चितळसर भागात आहेत. कल्याणमध्येही शेकडो घरांचा पर्याय या सोडतीमुळे उपलब्ध होणार आहे.

याआधी २०२४ मध्ये म्हाडा मुंबईची सोडत निघाली होती. आता म्हाडा कोकणची सोडत निघणार आहे. जुलै महिन्यात कोकण विभाग कल्याण आणि ठाणे शहरांसाठी सोडत जाहीर करेल. म्हाडाच्या कोकण मंडळाने गेल्या दीड वर्षात तीन सोडती काढल्या. याद्वारे सुमारे दहा हजार लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता जुलै २०२५ मध्ये म्हाडा कोकण काढणार असलेल्या सोडतीमुळे हजारो नागरिकांचे मुंबई जवळ हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

म्हाडाने महाराष्ट्रात २०२५ - २६ या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ घरे बांधण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यात मुंबईतील पाच हजार १९९ घरांचा समावेश आहे. यामुळे घर खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत लोकांना दिलासा मिळण्यास मदत होईल. म्हाडा कोकणात नऊ हजार ९०२, पुण्यात १८३६, नागपूरमध्ये ६९२, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६०८, नाशिकमध्ये ९१, अमरावतीत १६९ घरे बांधण्याचे उद्दीष्ट डोळ्यांपुढे ठेवून काम करत आहे. म्हाडाने मुंबईतील घरांसाठी ५७४९.४९ कोटी, कोकणातील घरांसाठी १४०८.८५ कोटी, पुण्यातील घरांसाठी ५८५, नागपूरच्या घरांसाठी १००९ कोटी, छत्रपती संभाजीनगरमधील घरांसाठी ६५.९६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा