लॉजिस्टिक्स पार्क्सच्या क्षेत्रात ५ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत करार


मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक्स पार्क्स क्षेत्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक आणि २७,५१० रोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या सामंजस्य करारावर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्या करण्यात आल्या. राज्य सरकार तसेच ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होराॅयझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यात हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार नाशिक जिल्ह्यातील सिन्नरसह पनवेल, भिवंडी, नागपूर, चाकण, खंडवा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क्स विकसित केले जाणार आहेत.


आज झालेला सामंजस्य करार राज्यातील प्रमुख औद्योगिक आणि मल्टिमोडल लॉजिस्टिक्स क्षेत्रांमध्ये आधुनिक लॉजिस्टिक्स आणि इंडस्ट्रियल पार्क्सच्या विकासासाठी होणार आहे. या करारानुसार महाराष्ट्रात १० हून अधिक आधुनिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. यासाठी ७९४.२ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार असून यापैकी १ कोटी ८५ लाख चौरस फूट जमिनीवर बांधकाम करण्यात येईल. ही परिवर्तनात्मक भागीदारी नागपूर, मुंबई, पुणे आणि इतर ठिकाणी जागतिक दर्जाचे, पर्यावरण, सामाजिक आणि शासकीय अनुकूल असे औद्योगिक तसेच लॉजिस्टिक्स हब्स तयार करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारी आहे. भारतातील उत्पादन, वेअरहाउसिंग आणि पुरवठा साखळी उत्कृष्टतेसाठी एक सशक्त पायाभूत रचना निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.



सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, ब्लॅकस्टोन ॲडहायझर्स प्रा. लि.चे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक तुहिन पारिख, ब्लॅकस्टोन ॲडव्हायझर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक आलोक जैन, एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्सचे व्यवस्थापकीय संचालक आशीष अग्रवाल आदी उपस्थित होते.


Comments
Add Comment

Share Market Updates : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारावर दबाव असूनही सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सुधारणेचा कल

नवी दिल्ली : आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर देशांतर्गत शेअर बाजार नीचांकी पातळीवरून

Share Market : सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारावर दबाव; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण

नवी दिल्ली : आज सुरुवातीच्या व्यवहारात चढ-उतारामुळे देशांतर्गत शेअर बाजार दबावाखाली राहिला. व्यवहारांची

रुपयात घसरण; मद्यपींमध्ये चिंता

महेश देशपांडे मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जगात सर्वत्र जाणवत आहे. तेल हा जगाच्या

पगारातून जास्त पीएफ कापला जाणार? नवीन नियमांमुळे वेतन रचनेत झाले मोठे बदल

मुंबई : १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन कर आणि श्रम नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या रचनेत मोठे बदल

Volkswagen Taigun Facelift : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ९ एप्रिलला होणार लॉन्च

मुंबई : व्होल्क्सवॅगन टायगुन फेसलिफ्ट ही एसयूव्ही भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार असून कंपनीने तिची लॉन्च डेट ९

Maruti Suzuki : मार्च महिन्यात मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ; 2.25 लाख युनिट्सचा टप्पा पार

मुंबई : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मार्च 2026 महिन्यात विक्रीत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे.