इस्रायलचा गाझा पट्टीवर भीषण हवाई हल्ला; ६० पेक्षा अधिक नागरिक मृत, २२ बालकांचा दुर्दैवी अंत

  74

इस्रायल : गाझा पट्टी पुन्हा एकदा रणभूमी झाली आहे. इस्रायलने शनिवारी (१० मे) गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले केले, ज्यात किमान ६० नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये २२ लहान मुलांचाही समावेश आहे. जबालिया भागात झालेल्या हल्ल्यात इंडोनेशियन स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात हानी झाली असून अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.


या हल्ल्याआधी शुक्रवारी रात्री इस्रायली हवाई दलाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्नसाठा असलेल्या इमारतीवरही हल्ला केला होता. गाझामधील मदतीच्या हालचालींवर इस्रायलने कडक नाकेबंदी लागू केल्यामुळे हजारो नागरिक अन्न-पाण्याविना अडचणीत आले आहेत. अनेक मदत केंद्रे बंद करण्यात आली असून परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.



इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले की, "गाझामधील युद्ध थांबवण्याचा विचारही करता येणार नाही." त्यांच्या या वक्तव्यानंतर इस्रायल-हमास यांच्यातील शस्त्रसंधीची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने या हल्ल्यांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.


युद्धाच्या या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारत-पाकिस्तान दरम्यानही शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे तणाव वाढतोय, तर रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. अशा तिहेरी संघर्षाच्या छायेत जग पुन्हा एका मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं आहे.


मानवाधिकार संघटनांनी इस्रायलच्या कारवायांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. गाझाला अन्न व औषधांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणे ही उपासमारीची शस्त्रनीती असल्याचं सांगत या कृतीला युद्ध गुन्हा घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांसह अनेक देशांनीही इस्रायलच्या कारवायांवर आक्षेप घेतला आहे.


दरम्यान, इस्रायलचा दावा आहे की हे सर्व हल्ले हमासवर दबाव टाकण्यासाठी करण्यात येत आहेत, जेणेकरून ते ओलिसांची सुटका करतील आणि शस्त्र सोडतील. पण प्रश्न असा आहे की, या युद्धाच्या पेटलेल्या भट्टीत निरपराध नागरिकांचे बळी कधीपर्यंत जात राहणार?

Comments
Add Comment

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात