
गोपाळपूर, ओडिशा : भारताने 'भार्गवस्त्र' या नावाचे स्वदेशी, कमी खर्चिक काउंटर-ड्रोन शस्त्राची चाचणी यशस्वी केली आहे. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL)ने हे अत्याधुनिक ड्रोनविरोधी शस्त्र तयार केले असून, ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही एक मोठी झेप मानली जात आहे.
गोपाळपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीत, 'भार्गवस्त्र' मधील सूक्ष्म रॉकेट्सनी सर्व लक्ष्य भेदून आपली उद्दिष्टे साधली. भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तीन चाचण्या पार पडल्या. दोन वेळा एकेक रॉकेट आणि तिसऱ्या वेळी दोन रॉकेट्स सलग डागण्यात आले.

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानात एक वेगळाच गोंधळ सुरू झाला आहे. सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे की भारताने ...
'भार्गवस्त्र' २.५ किमी अंतरावरून लहान ड्रोन ओळखून नष्ट करू शकते. हार्ड-किल तंत्रज्ञानाने सुसज्ज हे शस्त्र विशेषतः ड्रोनच्या झुंडींचा (Drone Swarms) सामना करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
रशिया-युक्रेन युद्ध आणि अलीकडील ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने वापरलेले 'रिमोट टॉय ड्रोन' याच प्रकारातील होते. भारताने ते सर्व निष्क्रिय करत सामरिक ताकद दाखवून दिली.
भार्गवस्त्रच्या यशस्वी चाचणीनंतर भारताच्या हवाई संरक्षणात आता एक नवा मजबूत घटक सामील झाला आहे. यामुळे भारताची ताकद आणखी वाढली आहे.