मुंबई, बंगळूरु, गुजरातसह ६ आयपीएल संघांना धक्का

आफ्रिकेने आपल्या खेळाडूंना परत बोलावले


नवी दिल्ली : आयपीएल २०२५ चा हंगाम पुन्हा एकदा सुरू होत आहे, त्याची सुरुवात १७ मे रोजी बंगळुरू विरुद्ध कोलकाता सामन्याने होणार आहे. अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाईल. पण त्याआधी क्रिकेट साऊथ आफ्रिकेने एक धक्का दिला आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंना २६ मे पर्यंत परतण्यास सांगितले आहे. यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या मुंबई इंडियन्स, आरसीबी, गुजरात टायटन्स, पंजाब किंग्जसह ६ संघांचे नुकसान होणार आहे.


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ ते १५ जून दरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकेने संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी २६ मेपर्यंत परत येण्याचे निर्देश दिले आहेत. आयपीएल २०२५ मध्ये २० दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू वेगवेगळ्या संघांशी संबंधित आहेत. परंतु यापैकी ८ खेळाडू असे आहेत, जे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संघाचा भाग आहेत. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार होता; परंतु भारत-पाकिस्तान तणावामुळे तो थांबवण्यात आला. आता अंतिम फेरीची तारीख ३ जून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आफ्रिकेचे खेळाडू २६ तारखेलाच संघात परतणार आहेत.


कॉर्बिन बॉश (मुंबई इंडियन्स), रायन रिकेल्टन (मुंबई इंडियन्स), वियान मुल्डर (सनरायझर्स हैदराबाद), मार्को जॅन्सन (पंजाब किंग्ज), एडेन मार्क्रम (लखनऊ सुपर जायंट्स), लुंगी एनगिडी (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), कागिसो रबाडा (गुजरात टायटन्स) आणि ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स)चा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम संघात समावेश करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण

सिडनी ODI मध्ये ऑस्ट्रेलिया ऑलआऊट

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियाने आधीच २ - ०

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक