रात्री Wi-Fi बंद करायचं का? शरीरावर होतो का खरंच परिणाम?

तज्ञ काय म्हणतात? संपूर्ण माहिती जाणून घ्या!


मुंबई : सोशल मिडियावर ‘केस कधी धुवायचे’, ‘नखं कोणत्या दिवशी कापायची’, ‘मुलाखतीला जाताना काय करावे’ अशा टिप्सचा सुकाळ असतो. अशा प्रकारची सोशल मिडियावर रील्स आणि फोटोद्वारे अनेक माहिती शेअर होत असते. तसेच आपण त्या माहितीवर विश्वास ठेवतो आणि लगेच ती इतरांना शेअर करून टाकतो. असाच एक सल्ला तुम्हीही ऐकला असेल, “रात्री झोपताना वाय-फाय राउटर बंद करा!” पण या मागे खरंच काही विज्ञान आहे का? शरीरावर त्याचा काही परिणाम होतो का? तर याबद्दलच जाणून घेण्यासाठी एका इंग्रजी दैनिकानं काही तज्ञांशी चर्चा केली आणि वाय-फाय राउटर बंद केल्यावर शरीरात काय बदल होतात ते जाणून घेतले.


हैद्राबादमधील 'लकडी का पुल' येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील कन्सलटंट फिजिशियन, डायबेटोलॉजिस्ट आणि क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉक्टर हिरन एस. रेड्डी म्हणाले की, एका आठवड्यासाठी रात्री वाय-फाय राउटर बंद केल्याने व्यक्तींमधले शारीरिक बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे.


वायफाय उपकरणे लो लेव्हल (low level), नॉन-आयोनायझिंग रेडिएशन उत्सर्जित करतात, जे वैज्ञानिक एकमतानुसार दररोजच्या संपर्कात सुरक्षित मानले जाते. पण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड्स (EMFs) बद्दल वाढलेली संवेदनशीलता नोंदवणाऱ्या लोकांसाठी हा बदल डोकेदुखी, झोपेचा त्रास किंवा मानसिक थकवा यासारख्या लक्षणांपासून आराम देऊ शकतो. पण असे असले तरीही इलेक्ट्रोमॅग्नेटिक अतिसंवेनशीलतेचे समर्थन करणारे क्लिनिकल पुरावे अनिर्णीत आहेत, असे डॉक्टर एस. रेड्डी म्हणाले.


हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल्सचे सल्लागार न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार म्हणाले की, याबद्दलचे बहुतेक अभ्यास प्राण्यांवर करण्यात आले आहेत. त्यामुळे वाय-फाय राउटर पाइनल ग्रंथीमधून मेलाटोनिन उत्पादनात व्यत्यय आणतात किंवा मानवाच्या झोपेमध्ये व्यत्यय आणतात याचा कोणताही निर्णायक पुरावा नाही. त्यांचा मते, वाय-फाय राउटर २.४ GHz किंवा ५ GHz फ्रिक्वेन्सी बँडमध्ये नॉन-आयोनायझिंग रेडिएशन उत्सर्जित करतात; जे खूप कमी ऊर्जेचे इएमएफ आहेत आणि डोक्याजवळ ठेवलेल्या सेलफोनमधून उत्सर्जित होणाऱ्यांपेक्षा तर खूप कमी आहे.


सामान्य घरगुती अंतरावर १-२ मीटर किंवा त्याहून अधिक तीव्रता झपाट्याने कमी होते, ज्यामुळे वाय-फाय राउटर मेलाटोनिनचे उत्पादन लक्षणीयरीत्या रोखू शकत नाही किंवा पाइनल ग्रंथीचे कार्य व्यत्यय आणू शकत नाही. दुसरीकडे ब्लू लाइटपाइनल ग्रंथीच्या कार्यात व्यत्यय आणून झोपेच्या गुणवत्तेवर प्रमाणावर परिणाम करतो, असे डॉक्टर कुमार म्हणाले.


याव्यतिरिक्त रात्रीच्या वेळी डिजिटल गोष्टींचा वापर कमी केल्याने मेलाटोनिनचे उत्पादन कमी होते. जे नियमित झोपण्याच्या आणि उठण्याच्या चक्राचे नियमन करण्यासाठी गरजेचे असते. तसेच रात्री वाय-फाय बंद करून झोपल्याने आपल्या झोपेच्या गुणवत्तेत अप्रत्यक्षपणे फायदा होतो. वाय-फायचा वापर कमी केल्याने आपला रात्रीचा स्क्रीनचा वापर मर्यादित होऊ शकतो. शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच संज्ञानात्मक कार्य, रोगप्रतिकारक प्रतिसाद आणि एकूण आरोग्य सुधारते, असे डॉक्टर रेड्डी म्हणतात.


सलग सात दिवस वाय-फाय बंद केल्याने थेट जैविक परिणाम होत नसला तरी त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो. झोप चांगली झाल्याने त्याचा परिणाम तुम्हाला शारीरिक व मानसिक दिसून येतो.

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,

Ganeshotsav 2025 : लहानशा खोलीतलं मोठं मन! चाळीतल्या १०x१० खोलीतून २ बीएचके घरापर्यंतचा प्रवास!

जुन्या आठवणींना उजाळा देणारी अनोखी गणेश सजावट नायगाव बी.डी.डी. चाळ नंबर १७/१८, लहान चाळीच्या खोलीतून आजच्या

मधुमेहग्रस्तांनी रात्री अजिबात करू नका या चुका !

मुंबई : मधुमेहग्रस्त रूग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीचे पालन करणे

Ganeshotsav 2025 : महाराष्ट्रात राहायचं तर मराठी शिकायचं! मराठी अस्मितेसाठी गणेशोत्सवात देखावा- १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण

मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि हक्कांची जाणीव करून देणारा एक विशेष देखावा परेल व्हिलेजमध्ये गणेशोत्सवात