Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारूचा कहर, १४ जणांचा मृत्यू, ६ जणांची स्थिती गंभीर

पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारूचा कहर, १४ जणांचा मृत्यू, ६ जणांची स्थिती गंभीर

अमृतसर: पंजाबच्या अमृतसरमध्ये विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची स्थिती गंभीर आहे. यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरण हे मजीठाच्या मडई गाव तसेच भागली गावातील आहे. दरम्यान, पोलीसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अमृतसर जिल्ह्याच्या मजीठाच्या मडई गाव आणि भागली गावात विषारी दारू प्यायल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांची स्थिती गंभीर आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मृतांचे शव हाती घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

या नकली दारू नेटवर्कचा तपास केला जात आहे. सरकारने दारू माफियांविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की विषारी दारूच्या सेवनाने १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांची स्थिती गंभीर आहे.

Comments
Add Comment