एअरबेसवर पोहोचले पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी हवाई तळावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.



पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवरची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा दावा केला होता. पण याच हवाई तळाला भेट देऊन आणि अधिकारी - कर्मचारी यांच्याशी संवाद साधून पंतप्रधान मोदींनी आदमपूरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे सप्रमाण दाखवून दिले.



याआधी २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. यापैकी २५ भारतीय होते आणि एक नेपाळी होता. ठार मारलेल्या २६ जणांपैकी २५ जणांना फक्त हिंदू आहेत म्हणून ठार करण्यात आले होते. नाव आणि धर्म विचारुन त्यांना अतिरेक्यांनी निष्ठुरपणे ठार केले होते. यावेळी मध्यस्तीचा प्रयत्न केला म्हणून एका स्थानिक मुसलमानाला ठार करण्यात आले होते. या घटनेनंतर ७ मे रोजी भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करुन अतिरेक्यांचे नऊ तळ नष्ट केले होते. भारताची कारवाई ही फक्त अतिरेक्यांच्या विरोधात होती. पण पाकिस्तानने थेट भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवले. नंतर भारताने पाकिस्तानच्या ११ हवाई तळांवर तसेच अतिरेक्यांच्या निवडक लाँचपॅडवर हल्ले करुन ते निकामी केले. भारत जोरदार कारवाई करत आहे आणि आपण बचाव करण्यास असमर्थ आहोत, याची जाणीव होताच पाकिस्तानने भारतापुढे शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. भारताने हा प्रस्ताव स्वीकारत १० मे रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधीला सहमती दर्शवली. लष्करी संकेतानुसार शस्त्रसंधी झाल्यानंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी चर्चा करुन पुढील कारवाईचे निर्णय घ्यायचे असे ठरले. यानंतर १२ मे रोजी संध्याकाळी दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी प्राथमिक चर्चा केली. या पार्श्वभूमीवर मंगळवार १३ मे रोजी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसला भेट दिली.

पंतप्रधान मोदींनी १२ मे रोजी रात्री आठ वाजता देशाला संबोधित केले होते. या भाषणात त्यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता. पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात देणे आणि अतिरेक्यांना भारताच्या ताब्यात देणे या दोन मुद्यांवर थेट भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा होईल. इतर कोणत्याही मुद्यावर भारत चर्चा करणार नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ बंद करावे आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे, मदत देणे तसेच मार्गदर्शन करणे थांबवावे. भारत आता दहशतवादी आणि दहशतवाद्यांना मदत करणारा देश यात फरक करणार नाही. पुन्हा जर दहशतवादी हल्ला झाला तर भारत दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी दहशतवादी आणि त्यांना मदत करणारा देश या दोघांविरोधात कारवाई करेल, असे पंतप्रधान मोदींनी जाहीर केले. भारताच्या दहशतवादाबाबतच्या धोरणातला हा बदल जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला भेट दिली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या सीमेजवळलील हवाई तळांची भूमिका महत्त्वाची होती. यामुळे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने सैन्याचे मनोबल उंचावण्यास मदत होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१