मुंबई : मोटरमनच्या सावधगिरीमुळे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचा अपघात टळला. गाडी स्टेशनवर येत होती त्याचवेळी प्लॅटफॉर्म स्वच्छ करण्याचे स्वयंचलित यंत्र रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. पण यंत्र कोसळले असताना गाडी नेहमीप्रमाणे विशिष्ट वेगात स्टेशनवर आली असती तर अपघात झाला. गाडी आणि रुळावर पडलेले यंत्र यांच्या धडकेमुळे अनर्थ झाला असता. पण मोटरमनला रुळांवर एक अवजड वस्तू पडल्याचे लांबून लक्षात आले आणि त्याने गाडीचा वेग झपाट्याने कमी केला. गाडी थांबवली. यामुळे स्टेशनवर काम करणाऱ्या सफाई कामगारांना रुळांवर पडलेले यंत्र हटवण्यासाठी थोडा वेळ मिळाला आणि पुढचा अनर्थ टळला. रुळांवर पडलेले यंत्र हटवणे शक्य व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक सातची रेल्वे वाहतूक थोडा वेळ बंद करण्यात आली होती.