मान्सून अंदमानमध्ये दाखल, आगामी ५ जूनला महाराष्ट्रात हजेरी लावणार

  48

मुंबई: मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून आगामी २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर पाच जून रोजी मान्सून कोकणामार्गे महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. तर १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


मान्सूनची वाटचाल यंदा वेगाने सुरू आहे.मान्सून सरासरी वेळेच्या ५ दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. मान्सूनने दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत वाटचाल केली आहे.


पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Comments
Add Comment

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत

भारताच्या आजी - माजी खासदारांचा जर्मनीत विवाह

बर्लिन : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि बिजू जनता दलचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांनी लग्न केले.

भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार

शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ? बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल

बंगळुरूतील चेंगराचेंगरीत 'या' अकरा जणांचा मृत्यू

बंगळुरू : आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानिमित्त बंगळुरूत कर्नाटक सरकारने विजयी