जिल्ह्यातील ५४ शाळांना मिळाले लाखोंचे ‘बक्षीस’!

  40

मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान


पालघर : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अभियानांतर्गत तालुक्यातून आणि जिल्हास्तरावर क्रमांक पटकाविणाऱ्या जिल्हा परिषदेच्या २७ आणि खासगी २७ अशा एकूण ५४ शाळांना शासनाकडून रोख बक्षीस देण्यात आले आहे. पारितोषिक स्वरूपात लाखो रुपयांचा निधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने शाळांमध्ये विविध प्रकारची कामे केली जाणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियान राज्यात २०२३- २४ मध्ये राबविण्यात आले. हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले असून या अभियानातील काही उपक्रमांची नोंद "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड"मध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे शासनाने २०२४- २५ मध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान नवीन उपक्रमांसह राज्यात राबविण्याचे निर्देश दिले.


शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा यांचा एक गट आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा यांचा एक गट अशा दोन वर्गवारीत हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील एका तालुक्यातील तीन अशाप्रकारे आठ तालुक्यांमधील ४८ शाळांची निवड करण्यात आली असून संबंधित शाळांना तालुका स्तरातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले आहे. तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना ३ लाख रुपये, द्वितीय २ लाख रुपये आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या शाळेला १ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत.



हिरडपाडा शाळा बक्षिसास ठरली पात्र


जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून ११ लाखांच्या बक्षिसास पात्र ठरलेल्या शाळेमध्ये शासकीय शाळा गटात जिल्हा परिषद शाळा झरी धांगडपाडा क्रमांक २ तर, खासगी शाळा गटात अनुदानित माध्यमिक आश्रम विद्यालय झरी या शाळांचा समावेश आहे. द्वितीय क्रमांक आणि ५ लाखांच्या बक्षिसास पात्र ठरलेल्या शाळेमध्ये शासकीय शाळा गटातून जिल्हा परिषद शाळा विलोशी आणि खासगी शाळा गटातून एस. पी. एच. हायस्कूल आणि पी. जी. ज्युनिअर कॉलेज या शाळेचा समावेश आहे तसेच जिल्हा परिषद अर्नाळा किल्ला या शाळेने शासकीय गटातून तिसरा क्रमांक आणि ३ लाखांचे बक्षीस मिळविले असून खासगी शाळा गटातून एकलव्य माध्यमिक आश्रम शाळा हिरडपाडा ही शाळा या बक्षीसास पात्र ठरली आहे.

Comments
Add Comment

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

न्यू इंग्लिश स्कूल सोनाळेत विद्यार्थिनीचा मृत्यू

वाडा : वाडा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सोनाळे या विद्यालयात एका पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा गेल्या दि.

४०० खाटांच्या हॉस्पिटलसाठी सातबाऱ्याचा अडसर!

२५ कोटींचा निधी डीपीसीकडे पडून विरार : नालासोपारा मौजे आचोळे, येथे प्रस्तावित असलेल्या ४०० खाटांच्या

वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते

घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटदारांची स्पर्धा

कंत्राटासाठी पहिल्यांदाच ४६ निविदा  विरार : वसई-विरार पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने मागविण्यात

खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि