विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!

१४ वर्षांच्या दमदार प्रवासाला भावनिक पूर्णविराम


मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा करताना ३६ वर्षीय कोहलीने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी प्रवासातल्या आठवणींना उजाळा दिला. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली असून, कोट्यवधी चाहत्यांमध्ये निराशेची लाट उसळली आहे.



भावनिक निरोप


"माझं मन कृतज्ञतेच्या ओलाव्यानं भरून आलंय. कसोटी क्रिकेटने मला आयुष्यात अनमोल क्षण दिले. मी या खेळाला सर्व काही दिलं आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा अधिक परत दिलं," अशी भावनात्मक प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली. संघसहकाऱ्यांपासून प्रशिक्षकांपर्यंत सर्वांचा त्याने विशेष उल्लेख केला.





कसोटीतील १४ वर्षांचा सुवर्णप्रवास


२०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या कोहलीने एकूण १२३ कसोटी सामने खेळले आणि ९,२३० धावा केल्या. ४६.८५ ची सरासरी, ३० शतके, ३१ अर्धशतके हे आकडे त्याच्या कारकिर्दीचा ठसा उमठवतात.



कर्णधार म्हणून सर्वोच्च यश


२०१४ ते २०२२ या काळात कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व करत ६८ सामने खेळवले. यापैकी ४० विजय मिळवत त्याने भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार होण्याचा मान पटकावला.



शेवटचा कसोटी सामना


कोहलीने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळला. त्या सामन्यात त्याच्या फलंदाजीला चमकदार शेवट मिळाला नाही – पहिल्या डावात १७, दुसऱ्या डावात केवळ धावा.



आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी




  • कसोटी: १२३ सामने | ९२३० धावा | ४६.८५ सरासरी | ३० शतके | ३१ अर्धशतके




  • वनडे: ३०२ सामने | १४१८१ धावा | ५७.८८ सरासरी | ५१ शतके | ७४ अर्धशतके




  • टी-२०: १२५ सामने | ४१८८ धावा | ४८.६९ सरासरी | १ शतक | ३८ अर्धशतके








टी-२०नंतर कसोटीलाही रामराम; वन-डेबाबत निर्णय बाकी


कोहलीने यापूर्वीच २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हणत त्याने आणखी एक पर्व संपवलं. मात्र सध्या वन-डे क्रिकेटबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही.



एक पर्व संपलं… विराट आठवणी कायम!


विराट कोहलीने केवळ आकडे नव्हे, तर अनोख्या नेतृत्वशैलीने, मैदानावरील जोशाने आणि क्रिकेटविषयीच्या निष्ठेने संपूर्ण पिढी घडवली. त्याचा कसोटी क्रिकेटमधून घेतलेला निरोप म्हणजे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा शेवट आहे.



संबंधित बातम्या...


रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त


विराट कसोटी क्रिकेटमधून का घेतोय निवृत्ती

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

बॅडमिंटनमध्ये २५ सेकंदांची ‘टाईम-क्लॉक’ प्रणाली लागू

नवी दिल्ली : बॅडमिंटन सामन्यांना अधिक वेग देण्यासाठी, खेळाची जागतिक नियामक संस्था ‘बीडब्ल्यूएफ’ने (बॅडमिंटन

BCCI : सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? क्रिकेटच्या देवानेच दिले खरे उत्तर

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना