
बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान १६३७७ जणांनी केला प्रवास
मुंबई (प्रतिनिधी) : मेट्रो-३ मार्गिकचा बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारी सकाळपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला झाला. आता आरे ते आचार्य अत्रे चौक, वरळी हा गारेगार प्रवास भूमिगत मेट्रोने अवघ्या ६० रुपयांत करता येणार आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आरे ते वरळी या मार्गावर ३२,७९१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉरिशनमार्फत (एमएमआरसी) देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-३ (अॅक्वालाईन) च्या बीकेसी मेट्रो स्थानक ते आचार्य अत्रे मेट्रो स्थानकापर्यंतच्या टप्पा २-अचे लोकार्पण शुक्रवारी पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 'मुंबई मेट्रो-३ एक्वालाईनच्या टप्पा २ अ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) चा सेवा विस्तार करण्यात आला. शनिवारपासून नागरिकांसाठी हा टप्पा खुला करण्यात आला. आरे ते वरळी या मार्गावर ३२,७९१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला, तर बीकेसी ते आचार्य अत्रे दरम्यान पहिल्याच दिवशी १६३७७ जणांनी केला प्रवास केला.
मेट्रो-३ मार्गावर सोमवार ते शनिवारी पहिली मेट्रो सकाळी ६.३० वाजता तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असणार आहे. रविवारी सकाळी पहिली मेट्रो सकाळी ८.३० वाजता तर शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता असणार आहे. मेट्रो-३ च्या दुसऱ्या टप्प्यात बीकेसी, धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक ही स्थानके आहेत. मेट्रो-३ चा वरळी ते कुलाबा हा शेवटचा टप्पा ऑगस्टपासून मुंबईकरांच्या सेवेत येईल.
वरळीतून फिनिक्स मॉलला जाणे सोयीचे व्हावे यासाठी मॉलतर्फे वरळी मेट्रो स्थानकावरून गाडलांची सोय करण्यात आली आहे. पासाठी मॉलकडून मुंबई मेट्रो रेल कॉरिशनसोबत करार करण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यातधारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक आहे, तर तिसरा टप्यात वरळी ते कफ परेड व अंतिम टप्पा पूर्ण झाल्यावर, नेहरू विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, अँट रोड, गिरगाव, काळबादेवी, सीएसएमटी, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड यांसारख्या स्थानकांचा समावेश असेल,