भारताचा हवाई हल्ला यशस्वी झाल्याची पाकिस्ताननेच दिली कबुली

इस्लामाबाद : पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर केले. या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाला. अखेर १० मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केली. ही शस्त्रसंधी झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सैन्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली. भारताच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाल्याचे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती खरी असल्याचा पुरावा पाकिस्तानकडून देण्यात आला आहे.

पाकिस्तानने रहीम यार खान नूर एअरबेस सात दिवसांसाठी बंद केल्याचे नोटॅम (नोटीस टू एअरमन) जारी केले आहे. हा नोटॅम म्हणजे भारताच्या हवाई हल्ल्यात रहीम यार खान नूर एअरबेसचे मोठे नुकसान झाल्याचा पाकिस्तानकडून देण्यात आलेला अप्रत्यक्ष पुरावा असल्याची चर्चा आहे. कारण रहीम यार खान नूर एअरबेस हा पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. भारत - पाकिस्तान दरम्यान संघर्ष थांबताच हा एअरबेस बंद करण्यात आला आहे. याचा अर्थ भारताच्या हवाई हल्ल्यात या एअरबेसचे प्रचंड नुकसान झाले आहे. जर हे नुकसान झाले नसते तर तणावाचे वातावरण असताना हा एअरबेस बंद करण्यात आलाच नसता, असे माजी वरिष्ठ सैन्य अधिकारी सांगत आहेत.

हवाई दलाच्या तळावर काम सुरू असल्यानं तो बंद ठेवण्यात येत असल्याचं पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. प्राधिकरणाने नोटॅम काढताना दिलेली ही माहिती म्हणजे भारताच्या हल्ल्यात नुकसान झाल्याची कबुली असल्याचे माजी वरिष्ठ सैन्य अधिकारी सांगत आहेत. पाकिस्तानने नोटॅम काढताना हवाईतळ बंद करण्याचे कारण सांगितलेले नाही. पण हवाईतळ अर्थात विमानतळ १२ मे ते १८ मे २०२५ असे सलग सात दिवस बंद राहणार आहे, असे जाहीर केले आहे.
Comments
Add Comment

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गूगल तयार; बनवले खास डूडल

सर्वत्र नववर्षाची चाहूल लागली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीचे आयोजन

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा

बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ हल्ले

एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला ढाका : बांगलादेशात हिंदू

इंडोनेशियात भीषण दुर्घटना

जकार्ता : इंडोनेशियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग