IPL 2025बाबत मोठी बातमी, १७ मेपासून पुन्हा सुरू होणार IPL सामने, या दिवशी रंगणार फायनल

  101

मुंबई: टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा झाली आहे. १७ मेपासून आयपीएलच्या सामन्यांना पुन्हा सुरूवात केली जात आहे. तर ३ जून ला या स्पर्धेचा फायनल सामना रंगणार आहे. ६ स्थानांवर आयपीएलचे एकूण १७ सामने खेळवले जाणार आहे. या नव्या कार्यक्रमात दोन डबल हेडरचा समावेश आहे. दोन रविवारी हे सामने खेळवले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

 


१७ मे ते ३ जून रंगणार सामने


नव्या कार्यक्रमानुसार, आयपीएल २०२५मधील शेवटचे उरलेले १७ सामने ६ विविध ठिकाणांवर खेळवले जातील. हे सामने १७ मे पासून सुरू होती आणि शेवटचा सामना ३ जून २०२५मध्ये खेळवला जाईल. या वेळेस प्रेक्षकांना एकाच दिवशी दोन सामन्यांची मजाही घेता येणार आहे. हे डबल हेडर सामने रविवारी आयोजित केले जातील.

दरम्यान, बीसीसीआयने हे स्पष्ट केलेले नाही की कोणते सामने कोणत्या मैदानावर होणार आहे. मात्र लवकरच सर्व स्थळांची अधिकृत घोषणा केली जाईल.

प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रम घोषित


आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांचा कार्यक्रमही घोषित करण्यात आला आहे. हा टप्पा लीगचा सर्वात रोमांचक टप्पा असतो. यात अव्वल ४ संघ खिताब मिळवण्यासाठी आमनेसामने असतात.

पहिला क्वालिफायर - २९ मे २०२५
एलिमिनेटर - ३० मे २०२५

दुसरा क्वालिफायर - १ जून २०२५

फायनल सामना - ३ जून २०२५
Comments
Add Comment

IND vs ENG : भारताच्या गोलंदाजांचा भेदक मारा, इंग्लंडचा पहिला डाव २४७ धावांवर संपुष्टात

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर

IND vs ENG: ज्यो रूट आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानातच जोरदार बाचाबाची!

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातील आज दुसऱ्या दिवशीओव्हल क्रिकेट मैदानावर एक मोठा

केनिंग्टन ओव्हल कसोटीत भारताचा पहिला डाव 'एवढ्या' धावांत आटोपला

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

दुखापतीमुळे ख्रिस वोक्स पाचव्या कसोटीतून बाहेर

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये

आयुष्याला थकलो होतो, आत्महत्या करावीशी वाटत होती...धनश्रीसोबत घटस्फोटावर युझवेंद्र चहलचे विधान

मुंबई: भारताचा क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या वर्षी मार्चमध्ये घटस्फोट झाला होता. आता चहलने धनश्री

प्रो कबड्डी लीग २०२५ चे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : प्रो कबड्डी लीग २०२५ हंगामाची सुरुवात २९ ऑगस्ट रोजी विशाखापट्टणम येथील राजीव गांधी इनडोअर