Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

Accident: छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

Accident: छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भीषण अपघात,  १३ जणांचा मृत्यू

रायपूर: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. रायपूर-बालोदाबाजार मार्गावर सरागांवजवळ रविवारी रात्री उशिरा एक ट्रक आणि ट्रेलर यांच्यात टक्कर झाली. या अपघातात कमीत कमी १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.


जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ९ महिला, २ मुली, एक किशोरवयीन तर ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.


या ट्रेलरमधून लोक बाळाच्या सहा महिन्याच्या कार्यक्रमावरून परतत होते. मत्यू पावलेले हे सर्व लोक छत्तीसगडच्या चटौद गावाचे निवासी पुनीत साहू यांचे नातेवाईक होते.


 


रायपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात त्यावेळेस झाला जेव्हा हे सगळे लोक कार्यक्रमावरून परतत होते. जखमींना उपचारासाठी रायपूरच्या डॉ. बी. आर. आंबेडकर मेमोरियल रुग्णालय आणि खरसोरा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे.

Comments
Add Comment