मुंबईत दोन कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने विदेशातून विमानाने तस्करी करुन शहरात आणलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा (वीड) जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी ३७ वर्षांच्या वीरू ठाकूर याला अटक केली आहे. अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाला अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात हायड्रोपोनिक गांजाची मोठी खेप उतरल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांनी विदेशी गांजाची तस्करी करणाऱ्या वीरू ठाकूर याला अटक केली. त्याच्याकडे सुमारे दोन किलो गांजाचा साठा सापडला. हा साठा बँकॉक, मलेशिया, थायलंड या देशातून आलेल्या प्रवाशांमार्फत तस्करी करुन भारतात आणला होता. प्रवाशांनी सामानात लपवून प्रामुख्याने कॉर्नफ्लेक्सच्या डब्यांमध्ये दडवून गांजा विमानातून मुंबईत आणला होता.


वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, ओशिवरा या भागातील श्रीमंत, उद्योगपती, व्यावसायिकांची तरुण मुले, बॉलीवूडमध्ये कार्यरत मंडळी यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा गांजा मुंबईत आणण्यात आला होता. वीरू ठाकूरच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती समोर येताच भरपूर माहिती उघड होण्याची शक्यता आहे.


हायड्रोपोनिक गांजा


हायड्रोपोनिक गांजा हा उच्च प्रतीचा गांजा आहे. इतर प्रकारांपेक्षा हा गांजा तुलनेने महाग असल्याने श्रीमंत, उच्चभ्रू वर्गामध्ये याला मागणी आहे. विदेशातून तस्करी करुन मुंबईत हा गांजा आणण्यासाठी मोठी साखळी कार्यरत असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. यामुळे तस्करी करणाऱ्या संपूर्ण यंत्रणेची माहिती मिळवून कारवाई करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,