एकनाथ आव्हाड
दोनदा वाजला
घरातला फोन
सारेच कामात
घेईल कोण?
मीच उचलला
फोन चटकन
म्हटलं, कोण?
बोला पटकन
बाबा आत्ता
नाही घरात
आई आहे
खूपच कामात
दादा करतोय
अभ्यास कधीचा
ताईने ओरडा
खाल्लाय आईचा
मलाही आहे
कामच काम
कामाने दमून
गेलोय जाम
झालं का बोलून
ठेवू का फोन?
पण नाव नाही सांगितलं
बोलतंय कोण?
काव्यकोडी
१) धान्याच्या कापणीसाठी
वापरले जाते
बागकाम करण्यासाठी
उपयोगात येते
लाकडी मूठ आणि
तोंड वळलेले असते
ओळखले का लोखंडी हे
साधन कोणते?
२) मेणापासून मुख्य
तिची निर्मिती होते
घरगुती उद्योगातही
ती तयार केली जाते
दंडगोलाकार आकार
वर छोटीशी वात
अंधारावर कोण बरं
करते मात ?
३) सतार, तंबोऱ्यासाठी
याचा होतो वापर
म्हातारी यात बसून
गेली दूरवर
वेलीवर येते
आकाराने मोठी
सांगा बरं ही
फळभाजी कोणती?
उत्तर -
- भोपळा
- मेणबत्ती
- विळा
चित्र रंगवा, बक्षीस जिंका
चित्र रंगवा, बक्षीस जिंका
[email protected]

चित्र रंगवा आणि बक्षीस मिळवा.
चित्र रंगवून कात्रण ई-मेल
करा अथवा टपालाद्वारे गुरुवारपर्यंत पाठवणे.
स्पर्धकाचे नाव, फोटो शाळेचे नाव व ठिकाण, इयत्ता, घरचा पत्ता आणि संपर्क क्रमांक.
सर्वोकृष्ट चित्र रंगवणाऱ्या विजेत्याला बक्षीस आणि प्रसिद्धी दिली जाईल.
प्रहारचे कर्मचारी आणि त्यांच्या परिवारास स्पर्धेत भाग घेता
येणार नाही.