काव्यरंग

गीत : भा. रा. तांबे


स्वर : आशा भोसले, सुधीर फडके



तुझ्या गळां, माझ्या गळां


“तुझ्या गळां, माझ्या गळां


गुंफूं मोत्यांच्या माळा-”


“ताई, आणखि कोणाला?”


“चल रे दादा चहाटळा !”



“तुज कंठी, मज अंगठी !”


“आणखि गोफ कोणाला?”


“वेड लागलें दादाला !”


“मला कुणाचें? ताईला !”



“तुज पगडी, मज चिरडी !”


“आणखि शेला कोणाला?”


“दादा, सांगूं बाबांला?”


“सांग तिकडच्या स्वारीला!”



“खुसूं खुसूं, गालिं हसूं-”


“वरवर अपुले रुसूं रुसूं”


“चल निघ, येथे नको बसूं”


“घर तर माझें तसू तसू.”



“कशी कशी, आज अशी”


“गम्‍मत ताईची खाशी !”


“अता कट्टी फू दादाशीं”


“तर मग गट्टी कोणाशीं?”





गीत : पी. सावळाराम


स्वर : लता मंगेशकर



हृदयी जागा तू अनुरागा


हृदयी जागा तू अनुरागा,


प्रीतीला या देशील का?



बांधिन तेथे घरकुल चिमणे


स्वर्गाचे ते रूप ठेंगणे


शृंगाराचे कोरीव लेणे,


राहावयाला येशील का?



दोन मनांची उघडी दारे


आत खेळते वसंतवारे


दीप लोचनी सदैव तू रे,


संध्यातारक होशील का?



घराभोवती निर्झर नाचे


जाणुन अपुल्या गूढ मनाचे


झाकुन डोळे एकांताचे,


जवळी मजला घेशील का?

Comments
Add Comment

ब्रह्मचर्य

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे शुकदेव हे भारतीय आध्यात्मिक परंपरेतील व पुराणातील एक तेजस्वी वैराग्यशील

तोलावा शब्द । बोलण्यापूर्वी ...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या बाबतीत घडलेला हा एक

खेड्यामधले घर कौलारू...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे जुन्या आठवणी निघाल्या की, आठवते ते चाळीतले आमच्या शेजारी राहणाऱ्या बापू

मुरलीरव म्हणजे सुमधुर स्वरसुगंध

स्मृतिगंध : लता गुठे आज सकाळी सकाळी एक बासरीवाला इमारतीच्या खालून बासरी वाजवत चालला होता. खूप सुंदर सूर त्यामधून

स्वराज्यजननी माँसाहेब

संस्कृतीचा गोडवा : पूर्णिमा शिंदे स्वराज्य प्रेरिका, स्वराज्य जननी, थोर राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँ

श्रद्धा

जीवनगंध : पूनम राणे आज मंगळवार आणि संकष्टीचा दिवस होता. हनुमान चौकातील गणेश मंदिर विविध रंगांच्या फुलांनी सजवले