Saturday, May 10, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Ceasefire Violates : What the hell….पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; ओमर अब्दुल्ला भडकले

Ceasefire Violates : What the hell….पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; ओमर अब्दुल्ला भडकले

इस्लामाबाद : पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं आहे. शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर अवघ्या ४ तासात पाकिस्तानकडून काही ठिकाणी ड्रोन दिसल्याची माहिती समोर आली आहे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणतात तीच गत पाकिस्तानच्या (Pakistan) बाबतीत आहे का, असा प्रश्न आता पु्न्हा उद्भवला आहे. पण प्रत्येक ड्रोन हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय सैन्य दल सज्ज असल्याचं दिसून आलं. भ्याड हल्ल्याचा मागचा भूतकाळ पाहताना श्रीनगर अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पाकिस्तानने अखनूर, राजौरी आणि आरएस पुरा भागातही ब्लॅकआऊट केला आहे. दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सीजफायरचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं आणि आपला राग व्यक्त केला आहे. हीच का शस्त्रसंधी? असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar abdullah) यांनी विचारला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी एकामागोमाग एक ट्विट करत शस्त्रसंधीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तानची पाठीत खंजीर खुपसण्याची सवय सर्वांना माहिती आहे. यामुळे भारत प्रत्येक हल्ल्याचं उत्तर देण्यासाठी सज्ज आहे.



What The Hell...ओमर अब्दुल्ला भडकले 



 ओमर अब्दुल्ला यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ओमर अब्दुल्ला पोस्ट करत लिहिलं की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये युद्धबंदी नाही. श्रीनगरच्या मध्यभागी हवाई संरक्षण युनिट सक्रिय करण्यात आले आहे.’ त्यानंतर सीजफायरचं काय झालं? स्फोटाचे आवाज ऐकून येत आहेत, असंही उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत सांगितलं. दरम्यान जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पंजाबमधील पठाणकोट आणि गुरूदासपूरमध्येही वीजपुरवठा खंडीत केल्याची माहिती आहे. त्यामुळे, सीमारेषेवरील तणाव अद्यापही कायम असून काही भागांत पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत. म्हणून, पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असंच या शस्त्रसंधी उल्लंघनावरुन दिसून येत आहे.



दरम्यान, भारतीय सैन्य दलाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. सीमाभागात कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नसल्याचं सांगितलं आहे. तसेच श्रीनगरमध्ये कोणताही धमाका झालेला नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणाव वाढवण्यासाठी अशी कृती करण्यात येत असावी असंही सांगण्यात येत आहे.
Comments
Add Comment