India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

  106

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील भागांमध्ये ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम S 400ने या हल्ल्यांना अतिशय प्रभावीपणे इंटरसेप्ट करत निष्फळ केले. याच्या प्रत्युत्तरात भारतीय लष्कराने कराची पोर्टला लक्ष्य केले आणि त्यांचे एक अमेरिकी एफ १६, दोन चीनी जेएफ १७ फायटर जेटसह रडार आणि डिफेन्स सिस्टीमला नेस्तनाबूत केले. यातच अमेरिका आणि तुर्कीची प्रतिक्रिया आली आहे.


अमेरिकेचे उप राष्ट्रपती जे डी वान्स यांनी वाढत्या तणावावर म्हटले आहे की, अमेरिका इच्छा असूनही या युद्धात सरळ हस्तक्षेप करणार नाही. त्यांच्या ते भारत आणि पाकिस्तान दोघांनाही हत्यारे टाकण्यास सांगणे सोपे नाही. अमेरिका राजकीय मार्गाने स्थिती बिघडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामते हा तणाव एका मोठ्या क्षेत्रीय युद्ध अथवा परमाणु संघर्षामध्ये रूपांतरित होणार नाही.



काय म्हणाले उपराष्ट्रपती जेडी वेन्स?


जेडी वेन्स म्हणाले, तुम्हाला माहीत आहे, अमेरिका भारतीयांना हत्यारे टाकण्यास सांगू शकत नाही. तसेच पाकिस्तानलाही आम्ही हे सांगू शकत नाही. यासाठी आम्ही राजकीय मार्गाने हे प्रकरण पुढे नेत आहोत. आम्हाला आशा आहे की हा तणाव एखाद्या क्षेत्रीय युद्ध, देव न करो अणुयुद्धामध्ये रूपांतरित न होवो. सध्या असे काही होणार नाही.



तुर्कीच्या राष्ट्रपतींनी दिली प्रतिक्रिया


दुसरीकडे तुर्कीचे राष्ट्रपती तैय्यप एर्दोगन यांनी या परिस्थितीवर आपली चिंता जाहीर केली. त्यांनी पाकिस्तानात मारल्या गेलेल्या लोकांना शहीद म्हटले आहे. ते म्हणाले, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव मिसाईल हल्ल्यांसह खुल्या युद्धात रूपांतरित होऊ शकतो. यात अनेक नागरिक शहीद झाले.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या