
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहे. महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आल्यानं पाकिस्तानची पळापळ सुरु झाली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तानी सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल शाहीर शमशाद मिर्झा मुनीरची जागा घेऊ शकतात. पाकिस्तानच्या सेनादलाचा प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील इम्रान खान याचे समर्थक देखील रस्त्यावर उतरून त्यांना जेलमधून सोडण्याची मागणी करीत आहेत.
एकंदर पाकिस्तान सरकारविरोधात देशातील नागरिकांचा रोष वाढलेला दिसून येत आहे. तर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या आंदोलन सुरु झालं आहे. बलुचिस्तान येथील बलुच लिबरेशन आर्मीनं शाहबाज शरीफ यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांना हटवण्याची मागिणी केलीय. तर, बलुचिस्तान फ्रीडम फायटर्सकडून पाकिस्तानवरच हल्ला करण्यात आला आहे. यामुळं पाकिस्तान दुहेरी अडचणीत सापडला आहे.