उत्तरकाशीत हेलिकॉप्टर कोसळले, तीन मुंबईकरांचा मृत्यू

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत वैमानिकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी आहे. जखमी व्यक्तीला उपचारांसाठी एम्स हृषिकेश येथे दाखल करण्यात आले आहे.


हेलिकॉप्टर एअरोट्रान्स कंपनीचे होते. हे हेलिकॉप्टर सहस्रधारा हेलिपॅड येथून उड्डाण केल्यानंतर हर्षिलच्या दिशेने येत होते. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि सहा प्रवासी असे एकूण सात जण होते. प्रवाशांपैकी चार जण मुंबईचे आणि दोन जण आंध्रचे रहिवासी होते. मृतांमध्ये तीन मुंबईकर आहेत.


उत्तरकाशी जिल्ह्यात गुरुवार ८ मे २०२५ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानी जवळ हेलिकॉप्टर कोसळले. दुर्घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे पथक आणि स्थानिक यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.


अपघाताची माहिती मिळताच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एक्स पोस्ट करुन शोक व्यक्त केला. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. नियमानुसार मृतांच्या नातलगांना आणि जखमी व्यक्तीला उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उत्तराखंडमध्ये मागील दोन - चार दिवसांपासून वातावरण प्रतिकूल आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अवकाळी पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी गारपीट झाली आहे. वादळी वारे वाहू लागल्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाले आहे.


हेलिकॉप्टर अपघातातील मृतांची यादी


कला सोनी, ६१, मुंबई
विजया रेड्डी, ५७, मुंबई
रुची अग्रवाल, ५६, मुंबई
राधा अग्रवाल, ७९, उत्तर प्रदेश
वेदवती कुमारी, ४८, आंध्र प्रदेश
वैमानिक रॉबिन सिंह, ६०, गुजरात


गंभीर जखमी


मस्तू भाकर, ६०, आंध्र प्रदेश

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम

Pm Modi Mizoram Visit : मिझोरमला मोठी भेट! रेल्वेपासून हेलिकॉप्टरपर्यंत…पंतप्रधान मोदींच्या घोषणांनी मिझोरम गजबजला!

मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात