Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताकडून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. आता नुकतंच पाकिस्तानकडून जम्मूमध्ये ड्रोन हल्ला करण्यात आला. आकाशात ड्रोनसदृश्य वस्तू दिसल्याने संपूर्ण जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जम्मूपाठोपाठ आता काश्मीरमधील कुपवाडामध्ये गोळीबार करण्यात आला.



जम्मू शहरात स्फोटांचे आवाज ऐकूआल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर शहरात एअर सायरन वाजवण्यात आले आणि तातडीने संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले. नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जम्मूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. स्फोटांच्या आवाजामुळे जम्मूतील हवाई सुरक्षा यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टीम) सक्रिय करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये ५ ते ६ स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




 १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न


७ आणि ८  मे च्या रात्री पाकिस्तानने भारतातील १५  शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपुर, बठिंडा, चंडीगढ़, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सारख्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताकडे असलेल्या अत्याधुनिक S-४०० सिस्टिमने पाकिस्तानचा मिसाईल, ड्रोन हल्ले फेल ठरवला.
Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या