Tuesday, May 6, 2025

देशक्रीडामनोरंजनताज्या घडामोडी

Indian Cricketer : भारतीय क्रिकेटपटूची दुसरी इनिंग! 'या' क्रिकेटपटूचं सिनेसृष्टीत पदार्पण

Indian Cricketer : भारतीय क्रिकेटपटूची दुसरी इनिंग! 'या' क्रिकेटपटूचं सिनेसृष्टीत पदार्पण

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने २४ ऑगस्ट २०२४ रोजी अचानक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शिखरने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ६३२ दिवसांपूर्वी १० डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळला होता. गेल्या काही काळापासून टीम इंडियाचा क्रिकेटर शिखर धवन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. क्रिकेटच्या मैदानात शिखरने चौकार आणि षटकार मारून मॅचमध्ये धुमाकूळ घातला आहे. आता शिखर धवन आपल्या डान्स आणि अभिनयातून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. ही गुडन्यूज त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली आहे.


/>

शिखर धवनच्या 'बेसोस' या गाण्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. याची पोस्ट शिखरने सोशल मीडियावर केली आहे. पोस्टरमध्ये शिखर धवन एक वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. या गाण्यात शिखर धवन बॉलिवूडच्या एका अभिनेत्री सोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जॅकलिन फर्नांडिस आहे. शिखर धवन आणि जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच एकत्र या गाण्यातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.






 










View this post on Instagram























 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)





या दिवशी गाणं होणार प्रदर्शित


बेसोस गाण्याच्या पोस्टरला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की,"पॉपची एक ठिणगी, जोशाची एक लाट...तुम्ही सर्व Besos साठी तयार आहात का?" शिखर धवनच्या चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक या गाण्यासाठी उत्सुक आहेत. शिखर धवनचे हे हटके गाणे ८ मे ला सकाळी ११ वाजता रिलीज होणार आहे. चाहते आता गाण्याच्या टिझरसाठी आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे. पोस्टमध्ये जॅकलिन फर्नांडिस समुद्रकिनारी बीच लूकमध्ये पाहायला मिळत आहे. तर शिखर धवनच्या बॉसी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पोस्टरमध्ये शिखर धवनचा स्वॅग लय भारी दिसत आहे.

Comments
Add Comment