पाकिस्तानकडून सलग बाराव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताकडून चोख प्रत्युत्तर

श्रीनगर : पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक होता. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. पाकिस्तानने सलग बाराव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करत गोळीबार केला. पाकिस्तानच्या कृत्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.


भारत सरकारने सीमेजवळच्या शेकडो गावांमध्ये मजबूत बंकर बांधण्यासाठी मदत दिली आहे. यामुळे ग्रामस्थ गोळीबार सुरू होताच बंकरमध्ये राहून स्वतःचे आणि नातलगांचे रक्षण करत आहेत. पाकिस्तानच्या सततच्या गोळीबारामुळे दररोज अनेक तास ग्रामस्थांना बंकरमध्ये थांबावे लागत आहे.


पाकिस्तानने बाराव्या रात्री हलक्या वजनाची आधुनिक लहान शस्त्रे वापरुन गोळीबार केला. कुपवाडा, बारामुला, पूँछ, राजौरी, मेंढर , नौशेरा, सुंदरबनी, अखनूरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. भारताने लगेच चोख प्रत्युत्तर दिले.


पहलगाममध्ये अतिरेकी हल्ल्यानंतर भारत - पाकिस्तान दरम्यान दोन वेळा डीजीएमओ पातळीवर चर्चा झाली होती. आता मंगळवार ६ मे रोजी सकाळी अकरा वाजता तिसऱ्यांदा भारत - पाकिस्तान दरम्यान डीजीएमओ पातळीवर चर्चा होणार आहे. यावेळी दोन्ही बाजूचे ब्रिगेडिअर दर्जाचे अधिकारी चर्चा करणार आहेत.



पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण


पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला आहे. भारताने सिंधू आणि चिनाब या दोन नद्यांचे पाणी भारतीय प्रकल्पांसाठी वळविण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. अटारी सीमा बंद करण्यात आली आहे. भारत - पाकिस्तान व्यापार बंद करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या भारतीय दुतावासातील अधिकारी - कर्मचारी यांची संख्या कमी करण्यात आली आहे. भारत - पाकिस्तान दरम्यानची टपाल सेवा, विमान वाहतूक, जहाज वाहतूक, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक आणि रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.



भारत सरकारने दिले सायरन चाचणीचे आदेश


केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना बुधवार ७ मे २०२५ रोजी नागरी संरक्षण मॉक ड्रिल घेण्यास सांगितले आहे. सायरन वाजवून चाचणी घ्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन सक्रिय करुन त्याच्याशी संबंधित प्रशिक्षण नागरिकांना देणे, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी मूलभूत नागरी संरक्षण तंत्रांचे प्रशिक्षण देणे, काळोखात अर्थात ब्लॅकआऊटमध्ये कामकाज करण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षित करणे, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांचे संरक्षण करण्यासाठी विशेष व्यवस्था करणे, हल्ला झाल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतराची व्यवस्था करणे या सर्वांचे नियोजन सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार