Friday, July 4, 2025

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई; ४८,००० हून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांना ई-चलान

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई; ४८,००० हून अधिक रिक्षा-टॅक्सी चालकांना ई-चलान

मुंबई : मुंबईत वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात ट्रॅफिक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत तब्बल ४८,००० हून अधिक ई-चलान फाडले आहेत. ही कारवाई १८ एप्रिलपासून ४ मेपर्यंत करण्यात आली. संयुक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारेंच्या देखरेखीखाली ही विशेष मोहीम पार पडली.


मोहीमेत सर्वाधिक कारवाई प्रवाशांना प्रवासासाठी नकार देणाऱ्या वाहनचालकांविरोधात झाली. तब्बल २८ हजार ८१४ चालकांनी ग्राहकांना नेण्यास नकार दिला, ज्यावर थेट दंडात्मक कारवाई झाली. त्याशिवाय १,१६४ चालकांनी वर्दी न घालणे, ६ हजार २६८ चालकांनी ठरलेल्या संख्येपेक्षा अधिक प्रवासी घेणे आणि १२ हजार १७१ जणांनी अन्य वाहतूक नियमांचा भंग केल्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली.



या संपूर्ण मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण ४०.२५ लाखांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे प्रवासास नकार दिलेल्या २८ हजार ८१४ चालकांचे लायसन्स निलंबित करण्याची प्रक्रिया प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (RTO) सुरू आहे.


मुंबईकरांना त्रास देणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना आता पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. ट्रॅफिक पोलिसांची ही कारवाई पुढील काळातही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment