नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या शाळेसाठी शिक्षक सज्ज

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पटसंख्येच्या तुलनेत आकृतीबंध नियमानुसार आवश्यक शिक्षकांची पूर्ण पदे असल्याने आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शाळेचे शिक्षक सज्ज झाले आहेत. मीरा-भाईंदर शहरातील आदिवासी पाडे, ग्रामीण भाग यातील सर्वसामान्य पालक आपल्या पाल्यांना पालिकेच्या शाळेत पाठवतात.



शहरात महापालिकेच्या ३६ शाळा असून त्यात २२ मराठी माध्यमाच्या, ४ हिंदी माध्यमाच्या, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी ५ असा सामावेश असून ८,५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी १४३ शिक्षक कार्यरत आहेत. महापालिकेच्या आकृतीबंध नियमानुसार २२५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. महापालिकेने १४३ स्थायी शिक्षकांसोबत ६३ शिक्षण सेवक, ३५ ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिक्षकांची संख्या २४१ झाली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी महापालिकेचे शिक्षक सज्ज झाले आहेत.

Comments
Add Comment

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा