'लाल किल्ला आमचा!' म्हणणाऱ्या मुघल वंशज महिलेची याचिका सुप्रीम कोर्टानं फाडून फेकली!

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर हक्क सांगत एक महिला सुप्रीम कोर्टात पोहोचते, आणि म्हणते, 'मी मुघलांची वंशज आहे... लाल किल्ला आमचाच आहे!'


कोलकात्याच्या सुलताना बेगम नावाच्या महिलेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत लाल किल्ल्यावर मालकी हक्क मागितला. वर म्हणाली, 'किल्ला नसेल द्यायचा, तर पैसे तरी द्या!' पण कोर्टाने तिचा दावा फेटाळत खडसावलं, 'फक्त लाल किल्लाच का? फतेहपूर सिक्री का नाही?'


१८५७ च्या बंडात ब्रिटिशांनी बहादूर शाह जफरला हाकलून लाल किल्ला ताब्यात घेतला, आणि आता जवळपास १६८ वर्षांनंतर त्याच्या वंशजाने ताबा मागितला? हे म्हणजे इतिहासाचे नवे पुरावे घेऊन न्यायालयात भावना विकण्याचा प्रयत्न!



सरकारनं पूर्वी पेन्शन दिली होती, ती कमी वाटू लागल्यावर आता थेट लाल किल्ल्यावर दावा? दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वीच ही याचिका फेटाळली होती, पण तरीही सुलताना बेगम थेट सुप्रीम कोर्टात गेल्या. तिथेही कोर्टाने स्पष्ट शब्दांत सांगितलं, "तुमचा दावा कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आहे. आम्ही ती याचिका फेटाळत आहोत!"





देशाच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेल्या लाल किल्ल्यावर असा बिनबुडाचा दावा करणं म्हणजे जनतेच्या इतिहासाची थट्टा नाही का? आज जर अशा याचिका चालू दिल्या, तर उद्या ताजमहल, कुतुबमिनार, अजिंठा-एलोरा सुद्धा कुणी तरी घेऊन बसतील!


देशाची वास्तू काही वारशाच्या नावावर चालत नाही, ती जनतेच्या अभिमानावर चालते.

Comments
Add Comment

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी

Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि