हास्यजत्रा फेम दत्तू मोरे झाला बाबा, शेअर केला परफेक्ट 'फॅमिली फोटो'

लग्नानंतर दोन वर्षांनी दत्तू मोरेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन 


मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून सर्वांना खळखळून हसवणाऱ्या दत्तू मोरेच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. तो एका गोंडस मुलाचा बाबा झाला आहे. स्वतः दत्तू मोरेनं इन्स्टाग्रामवर बाळासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली.


अभिनेता दत्तू मोरेला मुलगा झाला असून त्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. दत्तूने इन्स्टाग्रामवर परफेक्ट 'फॅमिली फोटो' शेअर करुन बाळाची हलकी झलकही दाखवली आहे.  त्याच्या या फोटोंखाली चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



सोशल मिडियावर शेअर केले फोटो


दत्तूनं आपल्या इन्स्टाग्रामवर सुरुवातीला दत्तू आणि त्याच्या बायकोचे प्रेग्नेंसी शूट दरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, या फोटोंसोबत दत्तूनं आपल्या गोंडस बाळाचे दोन सुंदर फोटोदेखील पोस्ट केले आहेत.


 


परफेक्ट फॅमिली फोटो


दत्तू मोरेनं आपल्या चिमुकल्यासोबतचा गोंडस फोटो शेअर करुन त्याखाली सुंदर कॅप्शनही दिलं आहे. त्यानं लिहिलंय की, "फायनली… तो आला! We now officially have a tiny human to blame. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण… मी सदैव कृतज्ञ आहे." दत्तू मोरेच्या या पोस्टवर त्याच्या सहकलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



2023 मध्ये बांधली लग्नगाठ


दत्तू मोरेनं 2023 मध्ये लग्नगाठ बांधली. दत्तूची पत्नी स्वाती घुनागे पेशानं डॉक्टर असून ती स्त्रीरोगतज्ज्ञ आहे.  स्वाती दत्तूच महाराष्ट्राची हास्य जत्रा मधलं स्कीट पाहायची, त्याबद्दल तिनं त्याला फेसबुकवर मेसेजसुद्धा केलेले. पुढे या दोघांमध्ये मैत्री झाली, आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट