दहशतवादविरोधात भारताला मिळाली जपानची साथ

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेतले आहेत.तसेच, भारतीय लष्कराने युद्धाभ्यास सुरू केल्यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. विशेष म्हणजे, अमेरीका आणि रशियासह अनेक देशांनी भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. अशातच, आता जपानदेखील भारताच्या बाजूने आला आहे.


भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री नाकातानी यांच्यात आज, सोमवारी एक मोठी बैठक झाली. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ला, भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींबाबत चर्चा झाली. याशिवाय, दोन्ही देशांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थिती आणि द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वाढवण्यावरही भर देण्यात आला. महत्वाचे म्हणजे, गेल्या 6 महिन्यांत दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांची ही दुसरी बैठक आहे.

भारत-जपान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत राजनाथ सिंह म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासोबत मजबूत एकता दाखवल्याबद्दल मी जपान सरकारचे आभार मानू इच्छितो. बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी X वर पोस्ट केले की, "नवी दिल्लीत जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी सॅन यांना भेटून आनंद झाला. भारत आणि जपानमध्ये एक विशेष, धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आहे. बैठकीदरम्यान, आम्ही संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आणि सीमापार धोक्यांचा सामना करण्यासाठी सहकार्य आणि प्रयत्न वाढवण्याच्या गरजेवर भर दिला."

Comments
Add Comment

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री