बारावीचा निकाल ९१.८८ टक्के, महाराष्ट्रातले १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान २०२५ दरम्यान घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवार ५ मे रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. हा निकाल दुपारी १ वाजता मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.


मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बारावीला ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी चौदा लाख २७ हजार ०८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी चौदा लाख सतरा हजार ९६९ जण परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्यांपैकी तेरा लाख दोन हजार ८७३ जण उत्तीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी संख्या कोकणमध्येच आहे. सर्वात कमी उत्तीर्ण विद्यार्थी संख्या लातूर विभागात आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९६.७४ टक्के एवढा लागला तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के एवढा लागला. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागांतून विद्यार्थी परीक्षेला बसले होते.


यंदा सहा लाख २५ हजार ९०१ मुली, तर सहा लाख ७६ हजार ९७२ मुलगे बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे.


विभागनिहाय निकाल २०२५


कोकण -९६.७४
कोल्हापूर ९३.६४
मुंबई – ९२.९३
संभाजीनगर – ९२.२४
अमरावती – ९१.४३
पुणे -९१.३२
नाशिक -९१.३१
नागपूर – ९०.५२
लातूर – ८९.४६


Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान